अकोला : पोलिसांच्या बदल्यांच्या अहवाल लीक प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदविला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राजकारण म्हणजे गांडूचे राजकारण असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलीय. ते अकोल्यात बोलत होते. आंबेडकर म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांना मैदानी दिलेर समजत होतो. परंतु त्यांचा दिलेरपणा दिसला नाही आणि मैदानीपणाही दिसला नाही. त्यांनी जी टेप स्पीकरला दिली, सभागृहात दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचे असेल तर गांडूचे राजकरण केले अशी टीका आंबेडकर यांनी केलीय. दिलेरपणाचे राजकारण जर करायचे असेल तर त्यांनी ती टीप लोकांसमोर जाहीर केली पाहिजे. फडणवीस यांनी ती टेप लोकांसमोर दिली असती तर पोलिसांनी नोटीस दिली नसती. पोलिसांनी प्रकरण दाबण्यासाठी नोटीस दिल्याचेही आंबेडकर म्हणाले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे (Deprived Bahujan Front) नेते आंबेडकर यांनी कॉंग्रेसच्या आत्मचिंतन बैठकीवर बोलणे टाळले आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणावर काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर pic.twitter.com/io2TVWkLaF
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 13, 2022
मी असं समजत होतो की, देवेंद्र फडणवीस हे मैदानी खिलाडी आहेत. परंतु, त्यांचा दिलेरपणा दिसला नाही. त्यांचा मैदानीपणाही दिसला नाही. त्यांनी जी टेप सभापतींना दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेमध्ये म्हणायचं असेल, तर गांडूचं राजकारण केलं. दिलेरपणाचं राजकारण करायचं असेल तर ती टेप त्यांना लोकांसमोर जाहीर केली पाहिजे. त्यांनी लोकांसमोर जाहीर केली असती तर पोलिसांनी ही नोटीस दिली नसती. सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनी नोटीस दिली आहे. जबाब कुठेही होओ. पण, मी आपल्यासमोर सामान्य माणसाची प्रतिक्रिया मांडलेली आहे, असा खरपूस समाचार प्रकाश आंबेडकर यांनी घेतला.