मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे. अशावेळी शिंदे गटातील १६ आमदार अपात्र होऊ शकतात. या १६ आमदारांपैकी महत्त्वाचे एक नाव म्हणजे भरत गोगावले. महाड मतदारसंघातून भरत गोगावले हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. पहिल्यांना त्यांनी २००९ मध्ये निवडणूक जिंकली. त्यानंतर २०१४ आणि २०१९ ला जिंकून आले. २०१९ मध्ये भरत गोगावले यांनी काँग्रेसचे माणिकराव जगताप यांचा पराभव केला. भरत गोगावले हे शेती करतात. शिवाय सामाजिक कार्यकर्ते आहेत. घाटकोपर येथील शिवाजी शिक्षण संघटन बहुउद्देशीय तांत्रिक हायस्कूल येथून त्यांनी शिक्षण घेतले. त्यांच्या कुटुंबात पर्यटन क्षेत्रात ठेकेदारी केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.
भरत गोगावले यांनी शिंदे गटात सहभाग घेतला. त्यानंतर न्यायालयात १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी याचिका शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून न्यायालयात दाखल करण्यात आली. यावर उद्या अंतिम निकाल अपेक्षित आहे. अशावेळी भरत गोगावले हे आमदार म्हणून राहणार की नाही, याचा निकाल उद्या लागणार आहे. त्यामुळे भरत गोगावले हे नाव चर्चेत आले आहे.
राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. या निकालात १६ आमदार अपात्र होणार की नाही, याचाही निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या सोहळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.
उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी केलेल्या आमदार भरत गोगावले यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे ठाकरे यांनी ठरवले आहे. शिवसेना शिंदे गटात गेलेले आमदार भरत गोगावले यांच्या समोर उद्धव ठाकरे यांच्याकडून तगडे आव्हान देण्यात आले आहे. भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या तथा माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.