गडचिरोली : महाराष्ट्रासह तेलंगाना छत्तीसगड कर्नाटकाचे भाविकांच्या दर्शन मोठ्या संख्येत घेतले. गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता (Pranhita) नदीला पुष्कर कुंभ मेळावा संपन्न होत आहे. या मेळाव्यात पहिल्या दिवशी 20 ते 25 हजार भाविकांनी शाही गंगास्नान करून दर्शन घेतले. महाराष्ट्रासह छत्तीसगड तेलंगाना राज्यातील भाविकांची गर्दी दर्शनासाठी उमटली. कर्नाटक राज्यातील काही महिला भाविक देशातील सात नद्यांमध्ये पुष्कर दर्शन घेऊन प्राणहितेच्या दर्शनासाठी पोहोचल्या. गडचिरोलीला, हिंदूत्व पुराणामध्ये (Hindutva Purana) उल्लेख असलेल्या भारत देशातील बारा नद्यांना बारा वर्षातून एकदा पुष्कर कुंभमेळावा (Pushkar Kumbh Melava) आयोजित केला जातो.
नेमकं काय आहे पुष्कर कुंभमेळावा-? कोण कोणत्या नदयांना कसा येतो पुष्कर-? पुष्करचा इतिहास पुरोहित पुजाऱ्यांकडून जाणून घ्यावा लागेल. हा पुष्कर मेळावा 13 एप्रिलपासून 24 एप्रिलपर्यंत सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशीही सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी उमटली. महाराष्ट्र राज्यसह छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या संख्येत दर्शन घेण्यासाठी येत आहेत. असं भाविक अश्विनी धात्रक यांनी सांगितलं.
गडचिरोली प्राणहिता नदीकिनाऱ्यावर पुष्कर कुंभ मेळावा संपन्न झाला. पहिल्या दिवशी 20 ते 25 हजार भाविकांची गर्दी उमटली. आज दुसर्या दिवशीही भाविक मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, जमुना या पाच नद्यांमध्ये शाही पवित्र स्नान करून कर्नाटक येथून महिला आल्यात. महिला भक्तगण त्या नदीत पुष्करच्या दर्शनासाठी आल्या. यात सात महिला कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाल्यात. त्यांनी पुष्कर प्राणहिता नदीचे दर्शन घेत शाही पवित्र स्नान केलं.