बुलढाणा : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावर वक्तव्य केलं. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आक्रमक झालेत. राहुल गांधी यांनी काळे झेंडे दाखविणार असा निर्धार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याबाबत बोलताना माजी मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले १९४२ साली राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलं होतं. आता २०२२ मध्ये राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत आहेत. ही यात्रा भारतीय राज्यघटनेला वाचविणारी आहे. या यात्रेमुळं सामान्य व्यक्तीचं स्वातंत्र्य आबाधित राहणार आहे. राज्यघटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानं प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे.
नितीन राऊत म्हणाले, भारत जोडो यात्रेला कोणी विरोध करत असेल तर ती त्यांचा विचारधारा आहे. या देशाला एकसंघ ठेवणं ही काँग्रेसची विचारधारा आहे. एकता व एकात्मचेच्या आधारावर एकत्र करणं आवश्यक आहे. सर्वांना एकत्रित करणं त्यांना न्याय देणं गरजेचं आहे.
सामाजिक न्यायासाठी भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी सुरू केली आहे. विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा. आमची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर अखंड राहणार आहे. लोकं आमच्याशी जुळताहेत, असही राऊत यांनी सांगितलं.
इंदोरमध्ये राहुल गांधी यांच्या धमकीचं पत्र सापडलं. यावर नितीन राऊत म्हणाले, दडपशाही, दंडीलेशाही या देशात काही नवीन नाही. इशारा देऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. २०१४ मध्ये जी सरकार आली आहे, त्यांनी हे हाताशी घेतलं आहे. हे होणार हे आम्हाला अपेक्षित आहे.