Matheran Unlock | अनलॉक! माथेरानमध्ये होणार पर्यटकांचे आगमन

| Updated on: Jun 27, 2021 | 12:01 PM

पर्यटनस्थळ माथेरानमध्येसुद्धा बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. केवळ पर्यटनावर इथल्या नागरिकांचे संपूर्ण जीवनमान अवलंबून असते. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आजपासून माथेरान अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे (Raigad Collector Gave Orders To Unlock Matheran And Open For Tourists).

Matheran Unlock | अनलॉक! माथेरानमध्ये होणार पर्यटकांचे आगमन
matheran
Follow us on

रायगड : रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मंदावली असून पर्यटनस्थळ माथेरानमध्येसुद्धा बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. केवळ पर्यटनावर इथल्या नागरिकांचे संपूर्ण जीवनमान अवलंबून असते. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आजपासून माथेरान अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे (Raigad Collector Gave Orders To Unlock Matheran And Open For Tourists).

त्यामुळे लॉकडाऊनच्या या काळातील एक प्रकारच्या निर्बंधावासात असल्याने अक्षरशः कंटाळून गेलेल्या पर्यटकांना निर्धास्तपणे माथेरानच्या सान्निध्यात भटकंती करता येणार आहे.

पर्यटकांच्या आगमनामुळे इथल्या सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्राबरोबर माथेरानही लॉकडाऊन झाले. त्यामुळे पर्यटनावर संपूर्णत: अवलंबून असणाऱ्या माथेरानकर नागरिकांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. अतिशय सामान्य जीवन जगणारे माथेरानकर पुरते हतबल झाले असून, पर्यटन सुरु झाल्यामुळे सर्वाच्या उपजीविकेचा प्रश्न सुटेल.

माथेरान हे अनलॉक होत आहे, ही सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. येथील लोकांचा रोजगार पूर्ण ठप्प झाला होता. अनलॉक झाल्यामुळे चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होईल, नागरिकांनीसुद्धा शासनाचे सर्व नियम, अटींचे पालन करावे, असं आदेश देण्यात आले आहेत.

 

Raigad Collector Gave Orders To Unlock Matheran And Open For Tourists

संबंधित बातम्या : 

नाशिकमध्येही शनिवार-रविवारी पर्यटनस्थळं बंद, सोमवारपासून मॉल सुरू होणार; छगन भुजबळ यांची घोषणा

Photo : लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; पर्यटकांचा हिरमोड

विकेंडला पर्यटनाला जाण्याचा प्लॅन करताय, विनाकारण घराबाहेर पडल्यास हमखास कारवाई , नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर