रत्नागिरी : चिपळूण परिसरात गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणकरांनाही रात्र जागून काढावी जागली. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरलं आहे. चिपळूणमध्ये असाच पाऊस सुरू राहीला, तर मात्र समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन समिती व मदतकार्य यांचे नियोजन जाहीर केलेय. हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यानं शहरामध्ये जाहीर आवाहन करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
पूर येण्याची शक्यता असलेल्या परिसरामध्ये त्या त्या भागातील नगरपरिषद सदस्य/अधिकारी/कर्मचाऱ्यांकडे अधिकचे साहित्य (बोये, रोप, लाईफ जॅकेट, रबर ट्युब) वाटप करण्यात आले आहे.
1. बाजारपुला जवळ गणेश विसर्जन घाट – 01
2. इंदिरागांधी सांस्कृतिक केंद्र – 02
पूरपरिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जाहिर निवेदन करुन नागरीकांना धोक्याचा इशारा देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या नागरीकांनी घाबरुन जावू नये आणि प्रशासनास सहकार्य करावं, असंही आवाहन करण्यात आलंय.
वाशिटी नदी आणि शिवनदी शेजारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कत राहण्याचे आवाहन करण्यात आलेय. चिपळूण परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळुणकरांनी रात्र जागून काढली. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले, तर पाऊस असाच सुरू राहिला तर समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे. चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन समिती व मदतकार्य यांचे नियोजन जाहीर केले आहे.
चिपळुणात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. वाशिष्ठी नदी पात्राची पातळी मात्र धोक्याची नाही. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळुणात पुन्हा पाणी भरेल का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. नगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. असाच पाऊस रात्री पडल्यास नदीपात्रामध्ये वाढ होऊ शकते.
Rain Live Updates emergency contact number list for Chiplun released by Municipal corporation 7 September 2021