अकोला : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली. भोंगे वाजविल्यामुळं लोकांना त्रास होतो. त्यांनी दगडफेक केली तर आमचे हात काही बांधलेले नाहीत, असं विधान राज ठाकरे यांनी केलं. यावर प्रतिक्रिया देताना अकोल्यात अमोल मिटकरी म्हणाले, राज ठाकरे यांनी हे दंगली भडविण्याचे काम करीत आहे. समान नागरिक कायदा अपेक्षित होता. हा कायदा नेमका कशासाठी खातात, हे तरी त्यांनी वाचून घ्यावे. प्रसिद्धीसाठी पोकळ घोषणा करता. यातून हाती काहीच लागणार नाही. तुम्ही संभाजी नगरलाजा, अयोध्येला (Ayodhya) जा, श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या. चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या. हनुमान चालीसाच्या दोन ओळी तुम्हाला म्हणता येत नाही, असा खोचक टोला आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरे यांना आज मारला.
राज ठाकरे यांनी केलेल्या व्यक्तव्याचा अमोल मिटकरी यांनी चांगला समाचार घेतला. पुढे ते म्हणाले, दोन वर्षांपासून राज्यावर आर्थिक संकट आहे. आता कुठे राज्य आर्थिक संकटातून बाहेर पडत आहे. सर्वसामान्य हिंदू असेल, सर्वसामान्य मुस्लिम असले त्यांचे रोजंदारीचे उदरनिर्वाहचे प्रश्न आहेत. भोंगे वाटणे, हातात तलवारी घेणे, तलवारी वाटणे हे आमचे प्रश्न नाहीत. राज्याला फुले, शाहू आंबेडकर यांची परंपरा आहे. देशाला बाबासाहेब यांनी संविधान दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचून काही लोकांना वाटत असेल तर काही लोकांना वाटत असेल तर मस्जिद वरील भोंगे उतरवा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल परत एकदा वाचावा. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळावर भोंगे वाजता कामा नाही, असा निकाल आहे. असा प्रकारच्या वलग्ना करायच्या. त्यांनी तलवारी काढल्या तर आम्ही तलवारी काढू. काल महाराष्ट्राने तुमचे मनसुबे उधळले आहेत. अनेक ठिकाणी मुस्लिमांनी हनुमान चालीसा वाचली. कायद्याचे राज्य आहे. कायद्याने राज्य चालते. हिंदू, मुस्लिम यांना शिक्षणाचे, बेरोजगारीचे दरवाढीचा प्रश्न महत्वाचे आहे. दंगली भडकल्या तर गृह विभागाने लक्ष दिले पाहिजे की, चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वर कारवाई केली पाहिजे, असेही आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.