जालना : आजचा दिवस महत्वाचा आहे आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला (Corona Vaccine)1 वर्ष पूर्ण झाले आहे.राज्यात आपण 90 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. दोन डोस 62 टक्के लोकांना लस दिले आहे. आणखी आपल्याला काम करायचं आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले. 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के लसीकरण केले आहे. स्कुल कॉलेज बंद असल्यामुळे आता घरोघरी जावून लसीकरण करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. लसीकरणाचे महत्व खूप मोठे आहे,लसीकरणमुळे हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी आहे असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील कोरोनाबाधितांपैकी (Corona Patient) 86 ते 87 टक्के लोक होम क्वारटाईन आहेत. त्यामुळे लसीकरण करणे महत्वाचं आहे. शाळेच्या बाबतीत मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. मुलांचे बाधीत होण्याच प्रमाण कमी आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. मात्र पंधरा दिवसात शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
60 लाख मुलांचे लसीकरण करायचं आहे त्यासाठी कोवॅक्सिन आवश्यक असून बुस्टर डोस लसीकरणही सुरु झालेलं आहे ते देणं गरजेचं आहे. आम्ही महिन्याचे हिशोब करुन 50 लाख कोविशिल्ड मागणी केली होती. केंद्र आम्हाला लस उपल्ब करुन देत नाही असे कधीच आम्ही बोललो नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. 8 लाख लसी आपण दररोज देत आहोत. महिन्याबराच्या हिशोबानं साठा असावा म्हणून लसी मागितल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असेल तिथं जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. त्यांना लसीकरणासंदर्भात पावलं टाकण्यास सांगण्यात आलं आहे.
शाळेच्या बाबतीत मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. मुलांचे बाधीत होण्याच प्रमाण कमी आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. शाळा बाबत 15 दिवसाच्या परिस्थिती नुसार योग्य निर्णय घेण्यात येणार आहे, असंही राजेश टोपे म्हणाले. कोरोना आणि ओमिक्रॉनबाबत लोकांच्या मनात भीती कमी झाली आहे. पण लोकांनी स्वत: सतर्कता बाळागावी, असं राजेश टोपे म्हणाले.
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसंदर्भात बोलताना राजेश टोपे यांनी रुग्णालयाला दररोज मेडिकल बुलेटिन जारी करावं, असं सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात झालेल्या गर्दी संदर्भात विचारलं असता सर्वांना नियम सारखे आहेत, गर्दी सर्वांनी टाळावी. राजकिय नेते , व्यापारी असेल किंवा सामान्य लोक असेल त्या सर्वांनी काळजी घ्यावी, असं राजेश टोपे म्हणाले.
इतर बातम्या:
Rajesh Tope clarify he not say central government not gave vaccine to Maharashtra