रत्नागिरी: जिल्हा कोरोना रुग्ण सापडण्यामध्ये सध्या राज्यात नंबर दोनवर आहे. आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करुनही एकीकडे वाढती रुग्ण संख्या आणि कोरोनामुळे वाढणारे मृत्यू असं दुहेरी संकट आरोग्य यंत्रणेसमोर उभं आहे. (Ratnagiri district at second level in corona positivity rate mortality rate also high)
आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करुन कोरोना रग्ण संख्येत घट होईल या प्रशासनाच्या अंदाजाचा फज्जा उडाला.राज्यातील इतर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होतेय मात्र रत्नागिरी जिल्हा त्याला अपवाद पहायला मिळतोय. कोरोना पॉझिटिव्ही दरात रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसऱ्या नंबरला आहे. आठ दिवसांचा कडक लॉक डाऊन करुन सुद्धा कोरोना रुग्ण संख्येबाबत कोणताच परिणाम झालेला नाही. रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 14.12 टक्के आहे.
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली गेली नाही. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यात ताळमेळ नाही. आरोग्य यंत्रणेचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळाले. पालकमंत्री मुंबईत आणि मंत्री फक्त आढावा बैठक घेण्यात व्यस्त होते. आरोग्य यंत्रणा कोलमडलेली होती आणि सुविधांचा अभाव होता. होम क्वारंटाईनमुळं कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.
रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 14.12 टक्के एवढा आहे. तर मृत्यूदर सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात जास्त आहे. रत्नागिरी गेल्या दोन दिवसात तब्बल 56 जणांचा बळी गेलाय. कोरोनाचा मृत्यू दर जिल्ह्यात 3.46 टक्के एवढा आहे. तर, रिकव्हरी रेट 86.91 टक्के एवढा आहे.
कोरोना बाधितांची आकडेवारी 10 जूनला 426 रुग्ण आढळले. तर 11 जून 693 आणि 12 जून 538 असे तीन दिवसांमध्ये एकूण 1657 रुग्ण आढळले. तर गेल्या तीन दिवसात अनुक्रमे मृत्यूसंख्या 10 जूनला 28,11 जून 28 आणि 12 जून 17 अशी होती. तीन दिवसात 73 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तर गेल्या तीन दिवसात 865, 719 आणि 375 असे एकूण 1955 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
लॉकडाऊनपूर्वी आणि त्यानंतर देखील 500 आणि त्यापुढे कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मृत्यूदराचा आकडा सुद्धा वाढतोय. गेल्या दोन दिवसात तब्बल 56 जणांचा जीव कोरोनामुळे गेलाय. त्याला कारण सक्षम आरोग्य यंत्रणा नाही. ग्रामीण भागात कोरोनाचा जास्त शिरकाव असल्याने कोरोना मृत्यंचा आकडा वाढतोय. सध्या जिल्ह्यात 48 टक्के आँक्सिजन बेड भरलेले आहेत. जिल्ह्यात चार हजाराहून अधिक रुग्ण आहेत. शहरीभागापैक्षा रत्नागिरीच्या ग्रामीण भागात कोरोनाची रुग्ण संख्या अधिक आहे. पण, प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाकडे लक्ष्य देणं आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेकडून अशीच ढिलाई होत राहिली तर राज्यात कोरोनाच्या सर्वच बाबतीत रत्नागिरी जिल्हा आघाडीवर असेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
खासगी शाळांच्या फी वाढीचा प्रश्न पेटला, पालक संघटनांचं थाळी बजाओ आंदोलनhttps://t.co/IyYCEKgrzP#Nagpur | #SchoolFeehike | #Parents | @VarshaEGaikwad | @NitinRaut_INC
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2021
संबंधित बातम्या:
राजकारण चंचल नसतं, शिवसेनेची विचारधारा चंचल झालेय; दरेकरांचा संजय राऊतांना टोला
तरुणाचा यूट्युब पाहून बॉम्ब बनवण्याचा प्रयोग फसला, डिफ्युज करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव
(Ratnagiri district at second level in corona positivity rate mortality rate also high)