शंकर देवकुळे, प्रतिनिधी, सांगली : सांगलीत पडलेल्या दरोड्यात आधी १४ कोटींची संपत्ती दरोडेखोरांनी लुटल्याची तक्रार करण्यात आली होती. आता काही दागिने ज्वेल्समध्येच सापडले. त्यामुळे फक्त सहा कोटींचाच दरोडा पडल्याची माहिती समोर आली.पोलीस दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी बिहार आणि दिल्लीच्या दिशेने तपास करत आहेत. अद्याप ठोस पुरावे हाती आले नाहीत. सांगली शहरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवरील दरोड्याचा तपास पोलीस करत आहेत. पथकाला मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीमुळे दिल्ली आणि बिहारमध्येच तपासावर लक्ष केंद्रित केले आहे. हैदराबादमधील काहींकडे केलेल्या चौकशीचाही यासाठी उपयोग झाला आहे.
दरोड्यानंतर १४ कोटी ६९ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे फिर्यादीत म्हटले होते. मात्र, शनिवारी रिलायन्सच्यावतीने सुधारित पत्र पोलिसांना दिले. त्यात सहा कोटी ४४ लाख ३०० चा ऐवज लंपास झाल्याचे म्हटले आहे. रविवारी दुपारी दरोडा पडल्यानंतर १४ कोटींचा ऐवज लंपास झाल्याचे सांगण्यात आले होते.
त्यानंतरच्या फिर्यादीत १४ कोटी ६९ लाख ३०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केल्याचे म्हणण्यात आले होते. मात्र, शनिवारी रिलायन्सच्या वतीने एक पत्र पोलिसांना देण्यात आले. त्यात हिरे आणि सोन्याचे दागिने असलेली पिशवी पेढीतच आढळून आली. सहा कोटी ४४ लाख ३०० रुपयांचाच माल चोरट्यानी लंपास केल्याचे पत्रात म्हटले आहे.
वसंतदादा मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्स या दुकानातून रविवारी भरदिवसा दरोडेखोरांनी १४ कोटी रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने लुटले होते. घटनेनंतर सुरू ठेवला आहे. एलसीबीसह पोलिसांची पथके विविध ठिकाणी तपासासाठी रवाना झाली आहेत.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि बिहार येथेच तपासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यातही बिहारमध्ये स्थानिक पोलिसांना सूचना देत तपास सुरु ठेवला आहे. हैदराबादमध्ये गेल्या दोन दिवसांपासून करण्यात आलेल्या तपासणीतूनही काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.