सांगली : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठच्या सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले आहे. कृष्णेचे पात्र हे इशारा पातळीकडे जात आहे. यामुळे या भागातील काही कुटुंबाचे रात्री तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे.तर शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे.
सांगली जिल्ह्यातील अनेक पूल आणि 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर परिस्थितीचे गांभीर्य ओळखत रात्री 100 हून अधिक नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर सुरू केले असून रात्री 11 पर्यंत अनेक कुटुंबांनी आपले स्थलांतर केले आहे. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरातील सूर्यवंशी प्लॉट, काकानगर, कर्नाळ रोडवर पाणीच पाणी झआलं आहे. अनेकांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत.
दुसरीकडे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय. कोयनेचं पाणी सोडल्यावर तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. पूरस्थिती उद्भवल्यावर काय करावं यासाठी बैठकीत चर्चा होणार आहे.
कोयना धरणातून सोडलेल्या पाण्याचा वेग जास्त आहे. पुढील तीन ते चार तासांत हे पाणी कराड, सांगलीमध्ये पोहोचू शकतं. कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणातून पाणी सोडल्याने चिपळून शहराला देखील धोका आहे.
सध्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर जरासा ओसरलाय. सध्या रिमझिम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. शेकडो लोक अजूनही पुरात अडकून आहेत. मोबाईल इंटरनेट सेवा बंद आहेत. प्रशासनाकडून मदत कार्य सुरु आहे.
(Sangali Krushna River Crosses Danger Level Rain Update)
हे ही वाचा :
VIDEO | कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, नदीकाठच्या गावातील रहिवाशांचे स्थलांतर
Chiplun Flood | चिपळूणमध्ये पुराची पाणीपातळी चार-पाच फुटांनी खाली, पावसाची रिमझिम सुरु