सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

| Updated on: Jun 24, 2021 | 11:03 PM

राज्यातील सात जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थिती अद्यापही चिंताजनकच आहे. यामध्ये सांगली जिल्ह्याचा देखील समावेश होतो (Sangli District Collector warn If the positivity rate increases will again impose strict restrictions).

सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करु, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
Follow us on

सांगली : राज्यातील सात जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थिती अद्यापही चिंताजनकच आहे. यामध्ये सांगली जिल्ह्याचा देखील समावेश होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (24 जून) सात जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी रुग्णसंख्या वाढत असल्यास निर्बंध आणखी कडक करण्याची सूचना केली. त्यांच्या या सूचनेनंतर सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची सूचना दिली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट जर 10 टक्क्यांच्या पुढे गेला तर पुन्हा जिल्ह्याला चौथ्या स्थरात समाविष्ट करुन कडक निर्बंध लागू करु, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला (Sangli District Collector warn If the positivity rate increases will again impose strict restrictions).

सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 9.30 टक्क्यांवर

सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपूर्वी कमी झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. राज्य सरकारच्या निकषानुसार सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांच्या आत आल्याने अनेक निर्बंध उठवण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्याची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागलेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 9.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील रुग्णवाढ पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचा कोरोना आढावा घेताना सात जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास त्या जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश स्थानिक प्रशासानाला दिले आहेत. यामध्ये सांगलीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि हिंगोली यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेनंतर सांगली जिल्हा अधिकारी अभिजित चौधरी यांनी खडबडून जागे होत सांगलीकर जनतेला कोरोना नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सांगलीचे जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन केलं नाही आणि पॉझिटिव्हिटी रेट जर दहा टक्क्यांच्या पुढे गेला तर चौथ्या सत्रात सांगली जिल्ह्याचा समावेश होऊन निर्बंध आणखी कडक करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिला आहे (Sangli District Collector warn If the positivity rate increases will again impose strict restrictions).

संबंधित बातमी :

घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, 7 जिल्ह्यांना अधिक काळजी घेण्याचं आवाहन