सांगली : सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील उमदी इथल्या आश्रम शाळेमधील तब्बल 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली. उमदीमधील समता आश्रम शाळेमध्ये हा प्रकार घडला होता. रात्री मुलांना उलट्या मळमळा झाली त्यानंतर 170 विद्यार्थ्यांना माडग्याळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. या विषबाधा प्रकरणात संस्थेच्या प्रकरणात संस्थेचे सचिव, मुख्यध्यापकांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन मुख्याध्यापक, दोन अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन मुख्याध्यापक, दोन अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई ही करण्यात आली आहे. तसेच आश्रमशाळा चालवताना व्यवस्थापनांनें गंभीर चूक केल्याने संस्थेची मान्यता का रद्द करु नये अशी कारणे दाखवा नोटीसही व्यवस्थापनाला देण्यात आली आहे.
माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले.यामध्ये एकूण 170 पेशंट ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे आले होते. यातील 79 पेशंट सध्या ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचार घेत आहेत असून त्यांची प्रकृती चांगली आहे.
उर्वरित 90 भर रुग्ण मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये आणि जत मधील रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत. ही घटना समोर आल्यानंतर तातडीने आरोग्य यंत्रणेने पाऊले उचलल्याने इतक्या मोठया संख्येने विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर योग्य वेळेत उपचार सुरू झाले.
दरम्यान, विषबाधा झालेल्या मुलांचे वय साधारण पाच वर्षापासून ते पंधरा वर्षाच्या आत मध्ये आहे.सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.