सांगली: जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सकाळी आठ ते दुपारी 4 वाजेपर्यंत आठ तासात 75 मिलीमीटर पाऊस येथे बरसला आहे.तर गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.परिणामी आज दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडून 4 हजार 883 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.वीज निर्मिती केंद्रातून 1125 कयुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण व वीजनिर्मिती असा दोन्ही मिळून सहा हजार आठ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
मुसळधार पाऊस तसेच धरणातील मुख्य दरवाजातून तसेच वीज निर्मिती केंद्रातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे.परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात तसेच चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे धरणातील विसर्ग कोणत्याही क्षणी आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हे धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे..
सांगली जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक गावांचा संपर्कहीन झाले आहे. तसेच औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. तर प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर शिरोळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदी, नाले, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यातच औदुंबर मंदिरात पानी गेले आहे. अजूनही पावसाची संथधार सुरूच आहे.
सांगली जिल्ह्यात गेले आठवडाभर पावसाची उघडझाप सुरू होती. कालपासून सलग पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात कृष्णा नदी दुसर्यांदा पात्राबाहेर पडून वाहत आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडून वाहत आहे. तर, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने आज कोयना धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोयना धरणात येणारी पाण्याची आवक पाहता येत्या 24 तासात हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या:
Chiplun rain : चिपळूणमध्ये पावसाचा हाहाकार, रस्त्यावर उभी कार वाहून गेली
Akola Rain | अकोल्यात पावसाचं थैमान, सरकारी रुग्णालयात सर्वत्र पाणी
(Sangli Rain Update Chandoli dam filled with water so administration release water from dam to river)