सातारा: अवघ्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 कयुसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं धराणातील पाण्याची आवक वाढली. परिणामी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. धरणात 1.45 611 कयुसेक पाण्याची आवक सुरु झाली आहे. कोयना धरणात चोवीस तासात 10 ते 12 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
कोयना धरणाचा पाणीसाठा 70.51 टीएमसी झाला आहे.
कोयना धरणातील पाणीसाठा नियमनासाठी धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनानं कोयना नदी काठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागानं सातारा जिल्ह्याला रेड अॅलर्ट दिला होता. त्यानुसार सातारा जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर व वलवण येथे 400 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे. सातारा, कराड, पाटण ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाच्या सरी सुरु आहेत. तर, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.
आज सकाळपर्यंतच्या हवामान विभागाच्या माहितीनुसार कोयनानगर 299 मिमी , नवजा 385 मिमी आणि महाबळेश्वर 404 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
साताऱ्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा आणि वेण्णा नदीच्यासंगमावरील साताऱ्यातील ठिकाण संगम माहुली येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी साताऱ्यातील संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे मृत कोरोनाबधितांवर अंत्यसंस्कार करण्याची समस्या निर्माण झाली आहे. अंत्यसंस्काराचे 14 अग्निकुंड पाण्याखाली गेले असून मृत कोरोना अंत्यसंस्कार करण्याची समस्या निर्माण झाली आहे.
पुणेवरून चिपळूणकडे मदती साठी जाणाऱ्या NDRF टीम कोयनेत अडकल्या असल्याची माहिती आहे. नवजा मार्गावर दरड व झाड पडल्याने टीम अडकून पडली आहे. कराड चिपळूण महामार्ग वाहतूक खोळंबल्या मुळे नवजा मार्गे टीम जात होती. एनडीएरआफच्या मदतीसाठी कोयना धरण व्यवस्थापन कडून जेसीबी व यंत्रणा पाठवण्यात आली आहे.
इतर बातम्या:
रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूर परिस्थिती, सतर्क राहून बचाव कार्य करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Satara Rain Update water released from Koyna Dam into river administration alerts villagers