सातारा : शहराजवळच असणाऱ्या मौजे शेळकेवाडीमध्ये शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लोकांची मृत्यूनंतरही ससेहोलपट चालू आहे. गावाला स्वतःची स्मशान भूमी नसल्याने दुसऱ्या गावात जाऊन अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. शेळकेवाडीत स्मशानभूमी नसल्याने त्यांना जवळच्या सोनगावमध्ये अंत्यसंस्कारासाठी यावं लागतं.
शेळकेवाडीत स्मशानभूमी नसल्याने तिथून मृतदेह सोनगावमध्ये आणला गेला आणि सोनगावच्या सरपंचांच्या सहकार्याने सोनगावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.पण निसर्गाच्या कोपामुळे सदर अंत्यविधी अर्धवट झालेला असताना नदीचे पाणी वाढले आणि अर्धवट अवस्थेत जळालेल्या प्रेत नदीत वाहून जाऊ लागलं.
पुन्हा वाहत्या पाण्यातून मृतदेह काढून अंत्यविधी करण्यात आला. हा अंत्यविधी पाणी नसलेल्या जागी करण्यात आला. पणअंत्यविधीची जागा सध्या पाण्याखाली गेलीय, म्हणजेच आता तिथे रक्षाविसर्जन होऊ शकत नाही.
गावाला स्मशानभूमी नसल्याने मौजे शेळकेवाडी येथील जनता त्रस्त असून झालेल्या गोष्टीस प्रशासन जबाबदार आहे, अशी गावातील लोकांची तक्रार आहे. प्रशासनाने हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी आणि मृत्युनंतर होणारी विटंबना थांबवावी, अशी जनभावना गावातील लोकांची आहे.
सातारा जिल्ह्यात संगम माहुली येथे कृष्णा नदीला आलेल्या पुराचं पाणी थेट कैलास स्मशानभूमीमध्ये शिरलं आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार होत असलेले निम्मी अर्धी जळालेले मृतदेह पाहून कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली.
साताऱ्यातील संगम माहुली येथे अचानक स्मशानभूमीत पाणी आल्यानं नुकताच अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांपर्यंत पाणी पाहचलं. त्यामुळे निम्मे अर्धे जळालेले मृतदेह पाहून येथील कर्मचाऱ्याची धांदल उडाली. पुराच्या पाण्यानं जळणारे मृतदेह विझण्याची शक्यता आहे. मात्र, व्यवस्थापन या मृतदेहांवरील अंत्यसंस्कार पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहे. असं असलं तरी पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने त्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे.
(Satara Shelkewadi village has no cemetery, go to Songaon village for cremation)
संबंधित बातमी :