Satej Patil : ही सार्वजनिक कामं, कुणाच्या घरी नाहीत; शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचा निधी रोखण्यावरून सतेज पाटलांची टीका

| Updated on: Aug 05, 2022 | 1:09 PM

आत्ता जे सरकार आले आहे, त्याला जनतेची सहानुभूती नाही. ते जनतेच्या मनातील सरकार नाही, हे त्यांनाही माहीत आहे. म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहेत, असे सतेज पाटील म्हणाले.

Satej Patil : ही सार्वजनिक कामं, कुणाच्या घरी नाहीत; शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचा निधी रोखण्यावरून सतेज पाटलांची टीका
राज्य सरकारवर टीका करताना सतेज पाटील
Image Credit source: tv9
Follow us on

कोल्हापूर : विमानतळाच्या संदर्भात जो निधी आम्ही दिला आहे, त्याबाबत जमीन ताब्यात घेण्यासाठी आज बैठक घेतली, अशी माहिती काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली आहे. तर निधी रोखण्यावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. विमानतळासंदर्भात (Kolhapur airport) आमच्या सरकारच्या काळात जवळपास 200 कोटींचा निधी मंजूर झाला होता. काही तडजोडीने या जमिनी ताब्यात घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले टाकली आहेत. लवकरात लवकर 64 एकर जमीन ताब्यात मिळावी. आधी आठवड्याला बैठक घेत होतो. आता जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला हे काम लवकर करण्याचे सांगितले आहे, असे पाटील म्हणाले. तर राजकीय (Political) सत्तांतराचा गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यावर कोणता परिणाम होईल असे वाटत नाही, असे ते म्हणाले. एका प्रवृत्तीच्या विरोधात स्वाभिमानी मतदारांनी ही निवडणूक लढवली आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले.

‘निवडणुका पुढे ढकलायचा सरकारचा हेतू’

एका बाजूला गोकुळमध्ये प्रवृत्ती होती, तिला हटवण्यासाठी गोकुळच्या स्वाभिमानी मतदारांनी या पॅनेलला निवडून दिले. त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. सत्ता असो किंवा नसो, आम्ही कायम जनतेत असतो, असे ते म्हणाले. 2011पासून जनगगना झाली नाही. त्यामुळे काही लॉजिक लावून हे मतदार संघ वाढवले होते. सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करत म्हटले आहे, की आम्ही निवडणुका घेऊ. सुप्रीम कोर्टानेदेखील त्याला अनुकूलता दर्शवली होती. असे असतानादेखील काहीतरी करायचे, निवडणुका पुढे ढकलायचा हा हेतू सरकारचा आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘सरकारला जनतेची सहानुभूती नाही’

आत्ता जे सरकार आले आहे, त्याला जनतेची सहानुभूती नाही. ते जनतेच्या मनातील सरकार नाही, हे त्यांनाही माहीत आहे. म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहेत. आपल्याला पसंती मिळणार नाही, याची भीती त्यांना वाटत आहे. 8 तारखेपर्यंत मंत्रिमंडळ झाले नाही तर मोर्चा काढायला लागणार आहे, असे सतेज पाटील म्हणाले. लोकशाही संपवायचे धोरण भाजपाचे आहे. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले सतेज पाटील?

‘निधी रोखणे योग्य नाही’

राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासाठी दिलेला निधी रोखण्यावरून सतेज पाटील म्हणाले, की हे योग्य नाही. यासंदर्भात दोन्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटले आहे. ही सार्वजनिक कामे आहेत, कुणाच्या घरची नाहीत, त्यावरील स्थगिती उठवा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.