अहमदनगर : अहमदनगर येथे बोलताना सीमावादावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक होताना दिसले. शिंदे-फडणवीस यांची सीमावादावरील बोटचेपी भूमिका घेत आहेत. एक इंचही जागा देणार नाही, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगा, असं आवाहन त्यांनी केले. खमकेपणानं काम करावं लागतं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत, अक्कलकोटवर दावा केला. त्यांना तुम्ही हे कदापि होणार नाही, असं ठणकावून सांगा ना, असा सल्लाही अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तुम्ही बोलतचं नाही. तुम्ही म्हणजे सरकार. राज्यकर्ते.
राज्यातल्या विजेचा खासगीकरणाचा डाव आता आखला आहे. सहा महिन्याचं काम बघीतलं तर सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेची मस्ती गेली आहे. सत्तेची मर्गृरी होत असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला.
राज्यात बेताल वक्तव्य करण्याचं प्रमाण वाढलं पाहिजे. पण, त्यांना आवरलं जात नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. मी एकदा चुकीचं बैठकीत बोललो होतो. मला पश्चाताप झाला. मी चव्हण साहेबांच्या समाधीच्या समोर बसलो. परत कधी चुकीचं बोललो नाही. कानाला हात लावत त्यांनी चूक केली होती, असं मान्य केलं.
एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी आता यांना कुणाला अडविलं, असंही अजित पवार म्हणाले. डंके की चोट पे करुंगा, म्हणणारे आता शांत का, असा सवालही त्यांनी केला.
साहेबांनी कधी कुणाचं घोडं मारलं. जुन्या जाणत्या व्यक्तीच्या घरावर हल्ला करता. घेतलेली अॅक्शन मागे घेता. या राज्यात चाललंय काय, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी सांगितलं की, मी सतत ओला दुष्काळासाठी भांडत होतो. शेतीमालाला हमीभाव दिला गेला पाहिजे. बेरोजगारांकडं लक्ष दिलं गेलं पाहिजे. पण, असं काही होताना दिसून येत नाही. जातिवादी लोकांना बाजूला ठेवता येईल. यासाठी प्रयत्न करा. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.