नाना पटोले म्हणजे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा प्रदेशाध्यक्ष; शहाजी बापू पाटील यांची जहरी टीका

| Updated on: May 08, 2023 | 1:27 PM

बाबुराव गायकवाड जेव्हा माझ्या गाडीत बसले. तेव्हाच दोन वेळा माझ्या अंगावर गुलाल पडला. त्यामुळे बाबुराव गायकवाड अजून 25 वर्षे जगले पाहिजे. कार्यक्रम पत्रिकेत नाव नसते तरी पवार साहेब यांचे दर्शन घ्यायला आपण आलो असतो...

नाना पटोले म्हणजे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा प्रदेशाध्यक्ष; शहाजी बापू पाटील यांची जहरी टीका
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पंढरपूर : काय झाडी, काय डोंगार फेम शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. नाना पटोले म्हणजे ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. पटोले हे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसकडे पद द्यायला माणूस नव्हता म्हणून पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलंय, अशी जहरी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. शहाजी बापू पाटील यांच्या टीकेवर नाना पटोले काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. त्याचा पुनरुच्चारही त्यांनी कर्नाटकाच्या सभेत केला होता. त्यावरही शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीस मी पुन्हा येईल म्हणाले होते. त्यानुसार ते परत आले आहेत. मुख्यमंत्री म्हणून परत येईल असं ते म्हणाले नव्हते. लबाड बोलू नका, अशा शब्दात शहाजी बापू पाटील यांनी विरोधकाांना सुनावले आहे. येत्या 12 तारखेला राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे. तो आमच्याच बाजूने लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

रोज सकाळी तेच बोलतं

राज्यात स्फोट होणार असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत चार महिने झाले असचं म्हणतं आहे. रोज सकाळी तेच बोलत असतात. एकदा ते जोरदार आपटतील. तेव्हा त्यांना कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

माझ्या टाचेचं कातडं निघालं

यावेळी सांगोला महाविद्यालयाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांचा सत्कार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यासाठी शहाजी बापू पाटील उपस्थित होते. तब्बल दहा वर्षानंतर शहाजी बापू पाटील हे शरद पवार यांना भेटले. यावेळी दोघेही स्टेजवर आजूबाजूलाच बसले होते. दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. शरद पवार शहाजी बापूंना काही तरी सांगताना दिसत होते. या भेटीवर शहाजी बापू यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली.

शरद पवार आणि माझे भावनिक नाते आहे. साहेबांच्या मागे फिरून माझ्या टाचेचं कातडं निघालं. आज साहेबांना भेटलो. आपण भावनिक झालो. दहा वर्षाने आमची भेट झाली. पवार साहेबांच्या भेटीने ऊर्जा मिळते. जिद्द निर्माण होते. सांगोला जनता आणि पांडुरंगाच्या कृपेने पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो…अशी प्रार्थना करतो, असं शहाजी बापू म्हणाले.