भाजप नेत्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलीय, त्यांना काहीच दिसत नाही; शंभुराज देसाई यांचा हल्ला

| Updated on: Jul 26, 2021 | 10:40 AM

: पूर परिस्थितीनंतर होत असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. (shambhuraj desai)

भाजप नेत्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलीय, त्यांना काहीच दिसत नाही; शंभुराज देसाई यांचा हल्ला
shambhuraj desai
Follow us on

कराड: पूर परिस्थितीनंतर होत असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. भाजप नेत्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यांना काहीच दिसत नाही. किमान अशावेळी तरी त्यांनी राजकारण करू नये, असा हल्ला शंभुराज देसाई यांनी चढवला. (shambhuraj desai attacks bjp over flood situation in maharashtra)

शंभुराज देसाई यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. भाजपच्या नेत्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलीय. त्यांना काही दिसत नाही. मुख्यमंत्री गेल्या चार दिवसांपासून विविध ठिकाणी भेटी देत आहेत. लोकांना दिलासा देऊन तातडीच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत. पण भाजपला हे दिसत नाही. किमान अशावेळी तरी राजकारण केलं जाऊ नये, असं शंभुराज देसाई म्हणाले.

मुख्यमंत्री चार दिवसांपासून ग्राऊंडवर

मुख्यमंत्री गेल्या चार दिवसांपासून स्वतः ग्राऊंडवर उतरून पूरग्रस्त भागातील लोकांना भेटत आहेत. त्यांना दिलासा देण्याचं काम करत आहेत. आज ते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कोयनेच्या काठावरील ज्या लोकांना पुराचा धोका होता तिथल्या लोकांना आम्ही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलंय. तिथे ते भेट देतील आणि लोकांना दिलासा देतील, असं त्यांनी सांगितलं.

पूरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश

साताऱ्यात या पुराच्या दरम्यान एकूण 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. आंबेघर आणि इतर दुर्घटनांमधला हा आकडा आहे. लोकांना तातडीची मदत आणि दिलासा देणं गरजेचं होतं. आज काही लोकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेकच्या स्वरुपात मदतही दिली जाणार आहे. एसडीआरएफ प्रकल्पाची सकारात्मक चर्चा अंतिम टप्प्यात आहे. दुर्घटना झाली की NDRF, TDRF ही रेस्क्यू ऑपरेशन करणारी पथक खूप लांबून येतात आणि मग बचवकार्याला उशीर होतो. जर कोयनेच्या परिसरात ही पथके स्थापना झाली तर येत्या काळात मध्यवर्ती ठिकाण असल्याने आजूबाजूच्या परिसरात याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल, असं ते म्हणाले. (shambhuraj desai attacks bjp over flood situation in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra Rain LIVE | सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप, जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण

पाचवा दिवस, अजूनही तळीयेतील 32 नागरिक बेपत्ता, मृतांची संख्या 53 वर; शोधकार्य सुरूच

Video: सीएम बीएम गेला उडत, आम्हाला नावं नका सांगू कुणाची? राणे जिल्हाधिकाऱ्यावर संतापले

(shambhuraj desai attacks bjp over flood situation in maharashtra)