Photo – अकोल्यात ती आली, तिने जिंकले…, पण वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले कसे ते पाहा
अकोला शहरातील जठारपेठ चौकात एका प्रॉडक्टच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना संध्याकाळी आमंत्रित करण्यात आले होते. रस्त्याच्या मधोमध कार्यक्रम घेऊन आयोजकांनी जनतेला अगदी वेठीस धरल्याचे दिसून आले.
1 / 5
अकोला शहरातील जठारपेठ चौकात एका प्रॉडक्टच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना संध्याकाळी आमंत्रित करण्यात आले होते. रस्त्याच्या मधोमध कार्यक्रम घेऊन आयोजकांनी जनतेला अगदी वेठीस धरल्याचे दिसून आले.
2 / 5
धार्मिक कार्यक्रम असला तरी प्रशासनाची परमिशन काढावी लागते. मग एवढा मोठा कार्यक्रम घेऊन हजाराहून अधिक गर्दी याठिकाणी जमा करण्यात आली. याची परमिशन आयोजकांना कुणी दिली.
3 / 5
एकीकडे भाजीवाले जरी रस्त्याच्या कडेला उभे राहिले तर त्यांच्यावर महापालिका व पोलीस कारवाई करतात. मग या प्रकाराकडे कसे दुर्लक्ष झाले. जनतेला वेठीस धरणाऱ्या या प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
4 / 5
विशेष म्हणजे हा कार्यक्रम सुरू असताना सिव्हील लाईन्स पोलिसांसह ट्रॅफिक पोलिसही कार्यक्रम बघण्यासाठी जमले होते. कायदा व सुव्यवस्था व सुरक्षितेची हमी घेणाऱ्या पोलिसांकडून जर असा प्रकार होत असेल तर कुणाकडे जनतेने दाद मागायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
5 / 5
जठारपेठ परिसरात प्रसूती रुग्णालय, बाल रुग्णालय, बँक, शाळा आहेत. संध्याकाळी हा कार्यक्रम असल्याने सकाळपासून मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. या सर्व प्रकारावरून प्रशासनाची तर या कार्यक्रमाला मूकसंमती होती असा प्रश्नही उपस्थित होत आहे.