कांद्याच्या रेटवरून शिंदे-भाजप सरकारवर निशाणा; जयंत पाटील म्हणतात, भाजप यांचं हित साधते

| Updated on: Mar 04, 2023 | 3:59 PM

समिती नेमेपर्यंत लहान शेतकरी कांदा विकेल. कारण त्याला पर्याय नसतो असं त्यांनी म्हटलंय. हा कांदा व्यापाऱ्यांकडे जाईल. व्यापाऱ्यांचा हित संवर्धन करण्याचे काम भाजपचे सरकार करतंय, असा टोला त्यांनी लगावलाय.

कांद्याच्या रेटवरून शिंदे-भाजप सरकारवर निशाणा; जयंत पाटील म्हणतात, भाजप यांचं हित साधते
जयंत पाटील
Follow us on

अहमदनगर : अहमदनगरला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कांद्याच्या भावावरून शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात एकत्र लढलो तर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश येईल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. कांद्याचे भाव पडले असून शेतकरी उघड्यावर पडला असल्याच्या भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहे. तसेच राज्य सरकारकडे आम्ही छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात मागणी केली. मात्र सरकारने थातूरमातूर उत्तर दिल्याची टीका त्यांनी केलीय. सरकारने समिती नेमण्याचा आश्वासन दिलं. समिती नेमेपर्यंत लहान शेतकरी कांदा विकेल. कारण त्याला पर्याय नसतो असं त्यांनी म्हटलंय. हा कांदा व्यापाऱ्यांकडे जाईल. व्यापाऱ्यांचा हित संवर्धन करण्याचे काम भाजपचे सरकार करतंय, असा टोला त्यांनी लगावलाय. सभागृहात राज्य सरकारने सांगितले आहे की, निर्यात बंदी नाही असं जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

जातनिहाय जनगणना व्हावी

अहमदनगरला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सावता परिषद पार पडली. यावेळी ओबीसी समाजाची मागणी आहे की, जातनिहाय सर्वेक्षण व्हावं. तसेच सावता परिषदेतील ठराव केला असल्याचं त्यांनी सांगितले आहे. आमच्या पक्षाचीदेखील हीच मागणी आहे. ही सर्व समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी, असं जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय.

ही युती लोकांना पटलेली नाही

एकत्र लढलो तर फार मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केलाय. तसेच आकड्यात सांगता येणार नाही. मात्र मेजॉरिटी ही महाविकास आघाडीची असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसेच भाजप हे निवडणूक घेण्यासाठी घाबरलेला आहे. कारण त्यांच्या लक्षात आलं की शिंदे गटाबरोबर जी युती केली आहे ही महाराष्ट्राला रुसलेली नाही. त्यामुळे शक्यतो निवडणुका पुढे ढकलण्याचा काम चालू असल्याचं जयंत पाटील यांनी म्हंटलंय.

अहमदनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. कांद्याला हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. कांदा उत्पादकांना दर मिळत नसल्याने ते नाराज आहेत. कांदा उत्पादकांचे अतोनात नुकसान होत आहे.