रत्नागिरी : राज्यातील राजकारणात सध्या लोकसभेच्या जागेवरून जोरदार चर्चा सुरु आहेत. लोकसभेच्या जागेवरून आता युती आणि आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत का असा सवाल आता अनेक जण उपस्थित करु लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभेच्या जागेवरून बिघाडी होताना दिसून येत आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्या जागेवर दावा केला असल्यामुळे आता त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यातच आता शिवसेना आणि भाजपमध्येही लोकसभेच्या जागेवरुन वाद उफाळून येणार की मित्रत्वाने हा वाद सोडवला जाणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभेच्या जागेवर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सत्तेत असलेल्या भाजपबद्दल त्यांचा आमच्या जागेवर डोळा नसल्याचे सांगत त्यांनी त्यांचा डोळा आमच्या जागेवर नसला तरी आपापला पक्ष वाढविण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मंत्री उदय ,सामंत यांनी लोकसभा जागा वाटपावरून भाजपमध्य नेमकं काय चाललय आहे. त्यावरच थेट त्यांनी निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या जागांवर भाजपचा डोळा नाही असं सांगितलं जात असलं तरी काही जागांवर डोळा असल्याची टीका वारंवार केली जात होती.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण लोकसभा आणि पोटनिवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार हंगामा सुरु होता.
त्यातच आता लोकसभेच्या जागेवरुन मित्र पक्षा पक्षामध्ये चढाओढ चालू असल्याचे दिसून येत आहे. आमच्या जागांवर भाजपचा डोळा नाही हे निर्विवाद सत्य पण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही भाजप शिवसेना युती म्हणूनच लढणार असून दोघांनाही त्याचा फायदा होणार असंही उदय सामंत यांनी सांगितले आहे.
प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे असं सांगत त्यांनी म्हटले आहे की, मी बारामती लोकसभा मतदारसंघावर ही दावा करू शकतो असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
यावेळी उदय सामंत यांनी सांगितले की, देशात आपल्या लोकशाही आहे, त्यामुळे कुणीही कुठल्याही मतदारसंघावर दावा करू शकतो. आमची शिवसेना उरलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असा टोला लगावत त्यांनी म्हटले आहे की, आमचा गट नाही तर शिवसेना आमची आहे असं त्यांनी ठाकरे गटाला ठणकावून सांगितले आहे.