‘त्या’ विधानावरून भिडे गुरुजी अमृता वहिनींना जाब विचारतील का?; सुषमा अंधारे यांचा सवाल

| Updated on: Dec 04, 2022 | 9:42 AM

भोंडेकर यांनी सरकारकडून सुमारे 6 कोटी रुपयांच्या अर्थ सहाय्याने चमडा फॅक्टरी उभी केली. मात्र, आता फॅक्टरी बंद असून त्या ठिकाणी टोलेजंग रिसॉर्ट उभे आहे.

त्या विधानावरून भिडे गुरुजी अमृता वहिनींना जाब विचारतील का?; सुषमा अंधारे यांचा सवाल
'त्या' विधानावरून भिडे गुरुजी अमृता वहिनींना जाब विचारतील का?; सुषमा अंधारे यांचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भंडारा: टिकली वरुण महिला पत्रकाराला बोलणारे भिडे गुरुजी अमृता वहिनीच्या मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का? असा सवाल ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भिडे गुरुजींना केला आहे. मुंबईतील पत्रकार महिलेला टिकली लावली नाही म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही असं भिडे गुरुजी म्हणाले होते. अमृता फडणवीस यांनी मंगळसूत्र घातल्यावर मला गळा आवळल्यासारखे होते असं विधान केलं होतं. त्यामुळे संस्कृती जपणारे भिडे गुरुजी आता अमृता वहिनींनाही जाब विचारतील का? असा सवालही अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांची काल भंडाऱ्यात प्रचंड जाहीर सभा पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुषमा अंधारे यांनी भिडे गुरुजींवर हल्लाबोल केला. तसेच शिंदे गटातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावरही या सभेतून चौफेर टीका केली. यावेळी सुषमा अंधारे यांनी जाहीरसभेतून संपत्तीचे विवरण देत आमदार भोंडेकर यांना गोत्यात आणले.

हे सुद्धा वाचा

भोंडेकर यांनी सरकारकडून सुमारे 6 कोटी रुपयांच्या अर्थ सहाय्याने चमडा फॅक्टरी उभी केली. मात्र, आता फॅक्टरी बंद असून त्या ठिकाणी टोलेजंग रिसॉर्ट उभे आहे. आता तर, त्यांनी कोट्यवधींची माया जमवली असून त्यांचे वडील साधे कारकून होते. त्यामुळे त्यांनी ही माया कुठून जमवली? असा सवाल अंधारे यांनी केला.

सध्या भोंडेकर यांच्याकडे आलिशान गाड्या, 16 हजार स्क्वेअर फुटाचा बंगला, सहा प्लॉट, मेडिकल कॉलेज, राईस मिल, शेती आहे. नगर पालिकेची परवानगी नसताना सात मजली इमारत बांधकाम करण्यात आले.

त्यामुळे त्यांच्या इमारतीवर पालिका हातोडा मारेल का? असा प्रश्न उपस्थित करून अंधारे यांनी दिवार पिक्चरचा डायलॉगही ऐकवला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. त्यावरूनही त्यांनी राज्यकर्त्यांवर हल्लाबोल केला. राज्यपाल यांच्या विरोधात कारवाईसाठी पुढाकार घेणे गरजेचे असताना राज्यकर्ते मात्र गप्प का? असा सवाल त्यांनी केला.