अकोला : मला वाटतं पंचवीस वर्षे मुंबई त्यांनी गिळली. मुंबई हे सोन्याची अंडी देणारी कोंबडी हे समजण्यात आलं. मुंबईकरांच्या हाती काय दिलं. याचे पहिले उत्तर द्या. शिंदे हे शिवसैनिक होते आणि आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचे कळवट विचारांचे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांना मुंबईच्या ज्या संकल्पना (concepts) होत्या. त्याचं फडणवीस – शिंदे सरकारच्या आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्रीय राजकीय (Politics) संस्कृती, परंपरा ( traditions) अशा प्रकारचे टोमणे. मत्सरानं बोलणं हे अलीकडच्या काळात वाढत आहे. हे राजकारणाला शोभा देणार नाही. त्यामुळे ते वैफल्याने एवढे ग्रासले आहेत. त्यामुळे ते रोज अशा प्रकारे काहीतरी बोलत आहेत, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अकोला येथे शिवसेनेवर केली.
प्रवीण दरेकर म्हणाले, आताच हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणार सरकार आहे. यापूर्वीच सरकार हे अफजल खानाच्या विचाराचं सरकार होतं. तशाप्रकारची सरकारची मनोवृत्ती होती. छत्रपतींच्या बाबतीत देखाव्याला मान्यता द्यायला हरकत नाही. अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना केली. तशाप्रकराचा निर्णय ते घेतली. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळं शिवसेनेनं गेल्या पंचेवीस वर्षांपासून ती गिळली, असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली.
दृष्टी तशी सृष्टी दिसते. त्यामुळं चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे. खेळाचा दर्जा देण्याची आवश्यकता असेल तर त्यांनाही दिला जाईल. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अतिवृष्टीनंतर दुसऱ्याचं दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांना मदत जाहीर केली. वेगवेगळ्या घोषणा केली. शेतकऱ्यांची काळजी घेऊ. काळजी करण्याचं काही कारण नाही. विरोधकांकडं चांगल्या सूचना असतील, त्याही स्वीकारल्या जातील. अन्यथा विरोधक त्यांचं काम करतील, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.
शिंदे गट आणि भाजपचे मेळावे सुरूच राहतील. प्रवीण दरेकर म्हणाले, शिवसेना-भाजपची मैत्री जुनीच आहे. लोकांना अभिप्रेत अशीच मैत्री आहे. वाशिम येथे जाण्यासाठी अकोला येथे आले असताना ते बोलत होते.