कोल्हापुरातील व्यापारी घेणार ‘मोकळा श्वास’, जिल्ह्यातील सर्व दुकाने आजपासून सुरु पण ‘वेळेची अट!’

| Updated on: Jul 19, 2021 | 8:18 AM

कोल्हापुरातील व्यापारी दुकानदार आज कित्येक महिन्यांनंतर मोकळा श्वास घेणार आहेत. कारण जिल्ह्यातील सर्व दुकाने उडायला आजपासून परवानगी देण्यात आलेली आहे. (Shops reopen In Kolhapur From today Due to corona positive patient Decrease)

कोल्हापुरातील व्यापारी घेणार मोकळा श्वास, जिल्ह्यातील सर्व दुकाने आजपासून सुरु पण वेळेची अट!
Kolhapur
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापुरातील व्यापारी, दुकानदार आज कित्येक महिन्यांनंतर ‘मोकळा श्वास’ घेणार आहेत. कारण जिल्ह्यातील सर्व दुकाने उडायला आजपासून परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेबरोबरच इतर दुकानही उडायला शासनाने आजपासून परवानगी दिली आहे.

कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट कमी

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालाय. तब्बल दोन महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे. शासन आणि प्रशासनाच्या कठोर परिश्रमानंतर आणि मेहनतीनंतर कोरोनाला थोड्या प्रमाणात का होईना लगाम घालण्यात कोल्हापूरकरांना यश आलंय.

आजपासून अत्यावश्यक सेवेतल्या दुकानांबरोबरच इतरही दुकाने उघडली जाणार

आजपासून अत्यावश्यक सेवेतल्या दुकानांबरोबरच इतरही दुकाने उघडली जाणार आहे. परंतु शासनाने वेळेचं बंधन घालून दिलेलं आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत दुकान उघडता येणार आहे. जवळपास तीन महिन्यानंतर जिल्ह्यातील व्यवसाय सुरळीत होणार आहे. वेळेचं बंधन घालून का होईना पण दुकाने सुरु होत असल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केलं जातंय.

नियमांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन

कोरोना संसर्गाचा दर जास्त असल्याने गेली तीन महिने आपण दुकाने बंद ठेवली होती. पण आता कोरोना पेशंटचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होतोय. त्यामुळे व्यापारी आणि दुकानदारांचं हित लक्षात घेऊन आपण दुकानं सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. पण अशावेळी सगळ्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

टेस्टिंग, ट्रेसिंग, लसीकरण… कोरोनाला हरविण्याचा मंत्र

दररोज अधिक प्रमाणात होणाऱ्या टेस्टिंगमुळे संसर्गाचे प्रमाण कमी होत चाललेलं आहे तसेच जास्त टेस्टिंग झाल्याने लक्षण नसलेले लोकसुद्धा (असिम्टमॅटिक पेशंट) मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे देखील संसर्ग रोखला गेला. शिवाय टेस्टिंगमुळे सौम्य लक्षण असणाऱ्यांना सुद्धा वेळेत उपचार मिळाले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील घटलेलं पहायला मिळत आहे. दुसरीकडे लसीकरण देखील जोरात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. लसीचा पुरवठा कमी झाला तरच लसीकरणात व्यत्यय येतोय नाहीतर एरव्ही लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

(Shops reopen In Kolhapur From today Due to corona positive patient Decrease)

हे ही वाचा :

कोल्हापूरकरांना मोठा दिलासा, तब्बल दोन महिन्यानंतर सर्वात कमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद, मृत्यू संख्याही घटली!