गोंदिया : गोंदिया जिल्हाच्या तिरोडा तालुक्यात ग्राम परसवाडा येथील दोन चिमुकले बहीण-भाऊ खेळत होते. सायकलचे टायर खेळता-खेळता गावालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मागील तलावाकडे गेले. त्या तलावाच्या पाण्यात बुडून दोन्ही चिमुकल्या चुलत बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. मुलगी निशा जितेंद्र (उईके वय-5) आणि मुलगा आयुष राजेंद्र उईके (वय-3 रा. परसवाडा) असे मृत बहीण-भावाचे नाव आहे.
गावात धान कापणीचा हंगाम सुरु आहे. घरातील सर्व कुंटुब धान कापणीसाठी शेतावर गेले होते. आई-वडील दोन्ही शेतात होते. घरी आजोबा असताना मुले अंगणात खेळत होती. खेळता-खेळता दोन्ही बहीण-भाऊ गावालगत असलेल्या तलावाकडे गेले. दोन्ही चिमुकले टायर खेळत होते. उतार भाग असल्यामुळे टायर सरळ तलावाच्या पाण्यात गेले.
टायर काढण्यासाठी मुलगी पाण्यात गेली. तिच्या पाठोपाठ मुलगासुद्धा पाण्यात गेला. समज नसल्यामुळे दोन्ही चिमुकले तलावाच्या पाण्यात बुडाले. दोन्ही बालके घरी नसल्यामुळे कुटुंबातील लोकांनी इकडे-तिकडे विचारफूस केली. गावातील इसमाने सांगितले की, ते तलावाकडे जाताना दिसले. त्यामुळे तलावाकडे जावून शोध घेण्यात आला. तेथे तलावाजवळ बालके खेळत असलेले टायर दिसले. त्यामुळे चिमुकल्यांची ओळख पटली. त्यानंतर दोन्ही बालकांचे मृतदेह आढळले.
दवनीवाडा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक भोसले आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन दोन्ही मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुबांना सोपविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा
मित्रांसोबत फिरायला गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर माहुलीच्या धबधब्यातील पाण्यात तरंगताना आढळला होता. शहापूर तालुक्यातील खोर, पिवळी वन विभागच्या हद्दीत तरुण मृतावस्थेत आढळला. भिवंडी कामत घर येथून 17 ऑक्टोबरला धीरज कमलेश माळी फिरायला गेला होता. मात्र, मित्र बुडाल्यानंतर सोबतच्या मित्रांनी तो अन्यत्र निघून गेल्याचा बनाव रचला होता.
काय आहे प्रकरण?
18 वर्षीय धीरज माळीसह तीन तरुण आणि त्यांच्या दोन मैत्रिणी असे एकूण 5 जण माहुलीच्या जंगलात फिरायला गेले होते. मात्र, धीरज पाण्यात बुडाला असताना त्याला टाकून मित्रांनी पळ काढला. आम्ही भिवंडीला गेलो असताना त्याला एका मित्राचा फोन आला आणि तो त्यांच्यासोबत निघून गेला. कोणत्या मित्राचा फोन आला ते आम्हाला काही माहीत नाही, असे मित्रांनी त्याच्या घरी सांगितले. नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतरही धीरजचा थांगपत्ता लागत नसल्याने शेवटी नारपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, घरी वेगळाच बनाव, अखेर तीन दिवसांनी बिंग फुटलं https://t.co/ZYGNADjDuh #Shahapur | #Accident | #Crime | #Bhiwandi
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2021
संबंधित बातम्या :
गोदावरीत उतराल तर जीवास मुकाल; रामकुंड परिसरात 4 दिवसांत 4 बुडाले
एकमेकांचा हात धरुन चौघे तलावात आंघोळीला उतरले, गटांगळ्या खाताना मदतीसाठी आरडाओरड, पण…