आज सकाळी संजय राऊत याने भाजप आणि मोदी सरकारचे 12 वाजवले, असा उल्लेख केला आहे. ज्याने स्वतःच्या मालकांचे तीन तेरा वाजवले आहे. त्याने असं बोलणं म्हणजे 2024 मधला मोठा विनोद आहे. ओसाड गावचे पाटील म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे तीन तेरा वाजवणारा भांडुपचा देवानंद संजय राऊत… ज्याच कुटुंब व मालक कोविड भ्रष्टाचार आणि खिचडी चोरी प्रकरणात असणारे कधीही जेलमध्ये जाऊ शकतात. महाराष्ट्रात केजरीवाल भाग 2 कधीही प्रदर्शित होऊ शकतो, असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी ठाकर गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरे याने स्वतःच्या पैशाने काही घेतलं नाही. भ्रष्टाचाराने यांचं आयुष्य बरबटलेलं आहे. व्यंकटेश उप्पर आज ही गायब आहे. त्याला राऊतने गायब केला असा आरोप मी केला होता. माणसांना गायब करणं महिलांना शिव्या घालणं अशा चारित्र्याचा माणूस आमच्या नेत्यांवर टीका करतो? लोकांच्या हत्यांनी यांचे हात बरबटलेले आहेत.नरेंद्र मोदी यांच्यावर एक भ्रष्टाचाराचा आरोप मागील 10 वर्षात हे करू शकलेलं नाहीत, असंही नितेश राणे म्हणालेत.
काँग्रेसच्या कोठ्यावर नाचणाऱ्या बाजारू दलालालनी दुसऱ्यांना नाचा बोलू नये. ज्याचा स्वतःचा अस्तित्व नाही त्याने अशी हिंमत करू नये. त्याचं उत्तर 4 जून ला देऊ कोणी कसा वचपा काढला ते समजेल. तुमच्या @#Xमध्ये दम असेल तर दक्षिण मुंबईची जागा लढवून दाखवा, असा इशाराही नितेश राणे यांनी ठाकरे गटाला दिला आहे.
तुम्ही नसल्यामुळे आम्ही टेंशन फ्री आहोत. तुमच्यासारखे खुनी, बलात्कारी गॅंगरेपचा आरोप असणाऱ्यांनी भाजपवर बोलू नये, असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनाही नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. नारायण राणे साहेबांनी सिंधुदुर्गमध्ये काय केलं? याचा हिशोब हवा असेल तर एका खुल्या व्यासपीठावर यावं… किती विकास कामे अडविण्याचा काम या विनायक राऊतने केलं आहे. विकासावर चर्चा करू, असं नितेश राणे म्हणाले.