अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील महावितरण कार्यालयात युवा सेनेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. आज (19 जुलै) युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारोटकर यांनी चक्क महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्याच्या टेबलवर साप सोडला. लोडशीडिंगची कोणतही पूर्वसूचना न देता नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे. (snake protest organised by Amravati Nandgaon Khandeshwar Yuva Sena at MSEDCL office due to irregular power cut)
मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून अवेळी विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या तालुक्यात कोठेही लोडशेडिंगची सूचना महावितरण कडून देण्यात आलेली नाही. तरीदेखील मागील एका महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. याच कारणामुळे येथील युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
युवा सेनेचे कार्यकर्ते तसेच युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारोटकर यांनी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील महावितरण कार्यालय गाठले. तसेच यावेळी त्यांनी वीजपुरवठा खंडित करण्यामागचे संबंधित अधिकाऱ्यांना कारण विचारले. तसेच अधिकाऱ्याच्या टेबलवर थेट साप सोडून अनोखं आंदोलन केलं.
दरम्यान, टेबलवर साप दिसताच महावितरणच्या अधिकाऱ्यांचा थरकाप उडाला होता. सध्या या आंदोलनाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
Mumbai Rains Live Updates | शहरात मागील दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू
Monsoon Alert : पुढचे 5 ते 6 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, पावसाचा जोर वाढण्याचा IMDचा अंदाज
त्याने जीवाची बाजी लावून तिघांना वाचवलं, शेवटी शरीरातील त्राण गेला अन् प्राण सोडला, तरुणाच्या मृत्यूमुळे नगर हळहळलंhttps://t.co/psKDU9Avzk#Ahmadnagar |#Death |#drowing
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2021