गणेश सोनोने, अकोला : सध्या सोशल मीडियावर (Social Media) फिरणाऱ्या एका चित्रफितीने (Films) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र ही केवळ एक अफवाच आहे. अशा प्रकारची घटना अकोला किंवा शेजारच्या जिल्ह्यात कुठेही घडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत (Monica Raut) यांनी केले आहे.
अकोला जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरविली जात आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नसल्याचे अप्पर पोलीस अधीक्षकांनी जाहीर केलं.
अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. लहान मुलांना पळवून नेण्याची घटना अकोला जिल्ह्यात किंवा आजू बाजूच्या जिल्ह्यात कोठेही घडली नाही. जिल्ह्यात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटनेची नोंद नाही.
अशी कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नसल्याचा दावाही पोलिसांनी केला. पालकांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे. आपली मुलं शाळेमध्ये ट्युशनला किंवा बाहेर जाताना त्याच्यावर लक्ष ठेवावे. असं आवाहनही पोलीस विभागाकडून करण्यात आलेलं आहे.
परंतु, ही सोशल मीडियावरील चित्रफित पाहून काही लोकं भयभित झाले आहेत. या चित्रफितीमुळं आपली मुलं सुरक्षित तर नाहीत ना, अशी शंका नागरिकांना येत आहे.
परंतु, पोलीस ठाण्यात बालकं पळविल्याची अद्याप नोंद नाही. त्यामुळं अशी टोळी असल्याची चित्रफित ही खोटी आहे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पण, आपल्या पालकांकडं लक्ष ठेवा, असंही आवाहन पोलिसांनी केलंय.