सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत आज टक्केवारीचा विषय चांगलाच गाजलाय. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या स्वीय सहाय्यकाने चार कोटी रुपये टक्केवारीच्या रुपात मागितल्याचा आरोप कृषी सभापती अनिल मोटे केलाय. या संपूर्ण टक्केवारीच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकच गोंधळ उडाला होता.कृषी सभापती अनिल मोटे लवकरच यासंदर्भात लाचलूचपत विभागाकडे तक्रार करणार असल्याच सांगितलंय, तर या संपूर्ण प्रकरणात माझा काहीही संबंध नसून संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे म्हंटलंय.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतला हा गोंधळ कांही विकासकामासाठी नाही. तर, हा गोंधळ झाला खुद्द जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेल्या अनिरुद्ध कांबळे यांच्या स्वीय सहायक सूर्यकांत मोहिते यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी, सांगोला तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कामासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी टक्केवारी मागितल्याचा कृषी सभापती अनिल मोटे यांनी केलाय.
अनिल मोटेंचा नेमका आरोप काय?
जिल्हा परिषद गटामधीन नराळे गावासाठी जे आरोग्य उपकेंद्रासाठी 65 लाख रुपये मंजूर झाले होते. नाथबाबा संस्था सांगोला यांना ते काम मिळालं होतं. अध्यक्षांच्या सहीनं वर्क ऑर्डर दिली जाते. बांधकाम विभागाकडून फाईल अध्यक्षांकडे गेली. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी अध्यक्षांना ठेकेदार जाऊन भेटले असता त्यांनी एक टक्केची मागणी केली. आम्ही ज्यावेळी अध्यक्षांना भेटलो त्यावेळी त्यांनी ज्यांनी अध्यक्ष केलं त्यांना साडेचार कोटी रुपये द्यायचे असल्याचं अनिल मोटे यांनी म्हटलंय. याप्रकरणी मोटे एसीबीकडं तक्रार दाखल करणार आहेत.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलंय. तर, या प्रकरणात माझा काही एक संबंध नसल्याचं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी स्पष्ट केलंय.
इतर बातम्या:
अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात होणार का, वाचा काय म्हणाले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
Solapur ZP Meeting controversy over collection of four crore rupees from percentage of development work