Video | भरधाव कारची दुकाकीस्वारांना धडक, यवतमाळमध्ये तिघांचा जागीच मृत्यू

| Updated on: Jul 14, 2021 | 10:00 PM

यवतमाळच्या नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आर्णी बायपास परिसरात कार आणि दुचाकीमध्ये एक भीषण अपघात झाला.

Video | भरधाव कारची दुकाकीस्वारांना धडक, यवतमाळमध्ये तिघांचा जागीच मृत्यू
नालासोपाऱ्यात भरधाव डंपरने दोघांना उडवले; अपघातात तरुणांचा जागीच मृत्यू
Follow us on

यवतमाळ : यवतमाळच्या नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आर्णी बायपास परिसरात कार आणि दुचाकीमध्ये एक भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. मृत तिघेही आर्णीहून यवतमाळच्या दिशेने निघाले होते. यावेळी समोरून येणाऱ्या कारने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. (speedy car hits bike Three men killed in Yavatmal Maharashtra)

कारची दुचाकीस्वारांना जोरदार धडक

मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वारांची नावं दीपक मेश्राम, नथ्थू कुंबरे आणि संदिप आत्राम अशी आहेत. हे तिघेही दुचाकीवर बसून यवतमाळच्या दिशेने जात होते. नागपूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना हे तिघेही आर्णी बायपासजवळ आले. मात्र, समोरुन अचानकपणे एक कार आली. अचानकपणे आलेल्या या कारने तीन दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. कारचा वेग जास्त असल्यामुळे हे तिघेही रस्त्याच्या दूर फेकले गेले. तसेच अपघात गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे तिघेही जागीच ठार झाले.

ठोस उपायोजना करण्याची मागणी

दरम्यान, नव्यानेच तयार झालेल्या या मार्गावर अनेक जण बायपास मार्गे आर्णीला ये-जा करतात. यावेळी प्रवासादरम्यान चुकीच्या दिशेने आल्यामुळे येथे भीषण अपघात घडतात. यापूर्वीसुद्धा या ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. या ताज्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे आता आर्णी बायपासवर काहीतरी ठोस उपायोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात चौघांचा मृत्यू

दरम्यान, अशाच प्रकारचा अपघात  9 जुलै रोजी अकोला जिल्ह्यात घडला होता. या ठिकाणी कार आणि ट्रकच्या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एकाने उपचारादरम्यान प्राण गमावले होते. अकोला शहरापासून हाकेच्या अंतरावर येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रिधोरा येथील रिलायन्सच्या पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला होता. या दोन वाहनांची धडक इतकी भीषण होती, की कारचा अक्षरशः चुराडा झाला होता.

इतर बातम्या :

भय इथले संपत नाही ! नागपुरात दीड वर्षात तब्बल अडीचशे पेक्षाही जास्त बलात्काराच्या घटना, हजारो गुन्हे

‘तुझी लायकी नाही, तुझ्यासोबत माझ्या मुलीचे लग्न करणार नाही’, प्रेयसीच्या आईचा दम, नंतर प्रियकराने जे केलं त्याने टिटवाळा हादरलं

अलिबागमध्ये रुग्णाने डॉक्टरच्या डोक्यात सलाईन स्टँड मारला, डॉक्टरला दृष्टीत

(speedy car hits bike Three men killed in Yavatmal Maharashtra)