मुंबई : राज्यात कोरोना (Corona) संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम (Corona Rule) लागू करण्यात आले आहेत. असे असले तरी राज्यात कोरोनाचा धोका कमी होताना दिसत नाहीये. खबरदारी घेऊनदेखील मंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत अनेक व्यक्तींना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाच्या विळख्यापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी राज्यात शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडच्या पवन जगडमवार या विद्यार्थ्याने अजब मागणी केली आहे. त्याने थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना पत्र लिहून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी केली आहे. या पत्राची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.
राज्यात शाळा, विद्यालये तसेच महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. मात्र याच शिक्षणपद्धतीला नांदेडमधील विद्यार्थी पवन जगडमवार याने विरोध केला आहे. त्याने ऑनलाईन शिक्षणातून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी केली आहे. या विद्यार्थ्याने थेट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी अनंत अडचणी आहेत. यामध्ये प्रत्यक्ष ज्ञान मिळत नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी दारूच्या दुकानाचा परवाना द्यावा, असे या विद्यार्थ्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. या अजब मागणीची राज्यात तसेच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
“माझी परिस्थिती अत्यंत गिरिबीची आहे. अनेक अडचणींना सामोरे जाऊन मी शिक्षण घेत आहे. ऑनालाईन शिक्षण देणार असल्यामुळे मला अडचणींचा सामना करावा लागतोय. मोबाईलला रिचार्ज करुनही इंटरनेट व्यवस्थित चालेल का याची शाश्वती नाही. नांदेड सारख्या शहरात राहूनही मला शिक्षणासाठी इतके पैसे खर्च करावे लागत असून फक्त ऑनलाईन शिक्षण मिळणार असेल तर माझा काहीही फायदा होणार नाही. खासगीकरणाचं शिक्षण मला परवडणारं नाही. माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरचेदेखील ओरडत आहेत. अशा महामारीत दारुची दुकाने सुरु आणि शिक्षण बंद असेल तर मी शक्षण घेऊन काय करु ? देशी दारूच्या दुकानाचा परवाना देऊन मला सहकार्य करा,” असे विद्यार्थ्याने आपल्या पत्रात म्हटले आहे.
इतर बातम्या :