पश्चिम बंगाल, राजस्थानमध्ये शून्य, महाराष्ट्रातही पराभव, पोटनिवडणुकीत भाजपला इंधन दरवाढीचा फटका ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

| Updated on: Nov 03, 2021 | 8:34 PM

देशभरात घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांचा निकाल नुकताच लागला. यामध्ये भाजपला अनेक जागांवर पराभवाला सामोरं जावं लागलं. इंधनाचे वाढते दर तसेच महागाई यामागे मुख्य कारणं असल्याचं म्हटलं जात आहे. या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इंधन दरवाढीमुळे भाजपला फटका बसला नसल्याचं म्हटलंय.

पश्चिम बंगाल, राजस्थानमध्ये शून्य, महाराष्ट्रातही पराभव, पोटनिवडणुकीत भाजपला इंधन दरवाढीचा फटका ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
SUDHIR MUNGANTIWAR
Follow us on

चंद्रपूर : देशभरात घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांचे निकाल नुकतेच स्पष्ट झाले. यामध्ये भाजपला अनेक जागांवर पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामागे इंधनाचे वाढते दर तसेच महागाई  ही कारणं असल्याचं म्हटलं जातंय. या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इंधन दरवाढीमुळे भाजपला फटका बसला नसल्याचं म्हटलंय. “देशातील 30 जागांवरील पोटनिवडणुकांपैकी 15 जागा भाजपने जिंकल्या आहेत. हे भाजपचं यश आहे. तसे नसते तर इंधन दरवाढीचा व महागाईचा परिणाम सर्व स्तरावर दिसला असता,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.

महागाईचा परिणाम सर्व स्तरावर दिसला असता

देशात 30 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांपैकी 15 जागा भाजपने जिंकल्या. इंधन दरवाढीचा व महागाईचा परिणाम सर्व स्तरावर दिसला असता. इंधन दरवाढ व महागाईसाठी केवळ केंद्र जबाबदार कसे. राज्य सरकार इंधनावरील आपला कर कमी का करत नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

इंधन दरवाढीमुळे भाजपला देशभरात फटका ?

महाराष्ट्रासह देशातील 13 राज्यात विधानसभेच्या एकूण 29 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा निकालही नुकताच लागला आहे. यामध्ये एकूण जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 15 जागांवर विजय मिळवला. तर 15 जागांवर हार पत्करावी लागली. या निकालामुळे आगामी काळात देशातील राजकारणाचे गणित बदलणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. तसेच मागील काही महिन्यांपासून होत असलेली इंधन दरवाढ तसेच गॅस दरवाढ यामुळे देशातील जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात रोष आहे. याच कारणामुळे भाजपला काही राज्यांत फटका बसला आहे, असेदेखील म्हटले जात आहे.

कोणत्या राज्यात किती जागांसाठी निवडणूक

या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण या निकालाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी जनतेचा कौल जोखण्यास मदत होणार असल्याचे म्हटले जातेय. विधानसभेसोबतच लोकसभेच्या तीन जागांवर पोटनिवडणूक झाली. यामध्ये दादरा आणि नगर हवेलीची जागा शिवसेनेने जिंकली. तर हिमाचल प्रदेशातील मंडी या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला. मध्य प्रदेशातील खांडवा येथील जागेवर भाजपने आपला झेंडा फडकवला. विधानसभा पोटनिवडणुकीत आसाममधील 5, पश्चिम बंगालमधील 4, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयमधील प्रत्येकी 3 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. तर बिहार, कर्नाटक आणि राजस्थान प्रत्येकी 2 जागांवर मतदान पार पडलं होतं. तर हरियाणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

इतर बातम्या :

Video : इथं राम क्वारंटाईन झाला 14 दिवस सीतेनं डोकवून नाही पाहिला रे, इंदोरीकर महाराजांची टोलेबाजी

प्रतिक काळेच्या आत्महत्येमुळे खळबळ, राजीनाम्याच्या मागणीनंतर शंकरराव गडाख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लसीकरण नसेल तर पगार नाही, प्रवेश नाही! नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे सरकारी कार्यालयांना आदेश