चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नॅचरलिस्ट सुमेध वाघमारे पशुपक्ष्यांच्या दुनियेतील जादूगार ठरलेत. मूळ हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुमेध आपल्या गावात लहानपण घालवताना यातून शिकत गेले. ते स्वतः सुमारे 200 हून अधिक पशुपक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढू शकतात. व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली निसर्ग पर्यटन संकुलात जंगल समजून घेण्यासाठी प्रकल्पातर्फे त्यांचे विशेष कार्यक्रम आयोजित होतात. केवळ वाघ म्हणजेच जंगल नव्हे तर जंगलात असलेले पशुपक्षी व इतर प्राणी देखील त्याचा अविभाज्य घटक असल्याबाबत ते पर्यटकांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या या मार्गदर्शनानंतर पर्यटक आपल्या सफारीदरम्यान अधिक सजगपणे जंगल पाहू शकतात.
सुमेध वाघमारे यांना रानकोंबडा, पोपट, मोराचा आवाज काढता येतो. सुमेध यांच्याकडे आवाज ऐकूण पक्षी येतात. चितळ, हरीणही येतात.
सयाजी शिंदे जसे निसर्गासाठी काम करतात, तसे आपण निसर्गासाठी काम केलं पाहिजे, असे सुमेध वाघमारे म्हणाले.
निसर्ग वाचवल्यास आपलं जीवन नक्की सुखी होईल. मच्छराचा आवाज काढून सुमेधने धमाल केली. लहान मुलगा कसं बोलेलं, हेही त्यानं नक्कील करून दाखवलं. सुमेश हा हिंगोलीचा. गावात शेळ्या राखायचा. शेळीचा आवाज काढला की, शेळी येते. शेळी आजारी पडल्यास तिचा आवाज बदलतो.
सुमेध हे म्हशीच्या पाठीवर बसून तिला राखायला न्यायचे. म्हशी जास्त बोलतात. पण, रेडे कमी बोलतात. सयाजी शिंदे यांच्या गेल्या १० वर्षांपासून सुमेध संपर्कात आले. आवाज काढत असताना स्वतः तो पशू असल्याची कल्पना करतो. त्यानंतर त्याचा आवाज काढतो, असं सुमेध म्हणाले.
सात एप्रिलला घर बंदुक बिर्याणी हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन बघावा, असं आवाहनही सुमेध वाघमारे यांनी केलं. त्याच्यासोबत अभिनेता सयाजी गायकवाड आणि नागराज मंजुळे उपस्थित होते. नागराज मंजुळे यांनी या पर्यावरणप्रेमी सुमेधचे कौतुक केले. सुमेधचे बालपण ग्रामीण भागात गेले. शेळ्या राखून, म्हशी चारून त्यांनी दिवस काढले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने निसर्गासोबत समरस होऊ शकले.