सिंधुदुर्ग : शिवसेनेतील त्या 16 आमदारांविषयी सर्वोच्च न्यायालय नेमका निर्णय का घेणार ते पात्र की अपात्र होणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. एकीकडे ते 16 आमदार पात्र ठरणार असल्याचा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांना आहे तर दुसरीकडे विरोधक असलेल्या ठाकरे गटाला मात्र ते 16 आमदार अपात्र ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या 16 अपात्र आमदारांविषयी शिवसेनेने विश्वास व्यक्त केला असला तरी ते अपात्र ठरले तर मात्र हे सरकारही कोसळणार असल्याचे मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे.
या आमदारांच्या निकालाविषयी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, आम्ही दावा करत नाही तर ठासून सांगतो आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पक्ष प्रतोद निवडण्याचा अधिकार पक्षप्रमुखाला आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे गटप्रमुखपद व गोगावले यांचे प्रतोदपद नियमबाह्य आहे असे मतही विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा अध्यक्षांनी जर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून भाजपला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
तर गद्दारांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर पुनश्च एकदा यांना सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा डोक्यावर हाणावा लागेल असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
शिवसेनेच्या त्या 16 आमदारांविषयी बोलताना खासदार विनायक राऊत या 16 आमदारांमुळे आता सरकार कोसळण्याची शक्यताही राऊत यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता न्यायालय या आमदारांविषयी काय निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
न्यायालयाचा निर्णय काय येईल तो येईल मात्र राज्यात स्थापन झालेले सरकार हे घटनाबाह्य सरकार असून त्यांना आता न्यायालयाचाच दणका बसणार असल्याचा विश्वासही विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.