रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यत, २०० च्यावर बैलजोड्यांचा सहभाग; अशी आहे बक्षिसांची लयलूट
देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती पार पडणार असल्याचा आयोजक पैलवान चंद्रहार पाटील यांचा दावा आहे. महाराष्ट्र राज्यातील 200 च्या वर टॉपच्या बैलगाडी मालक यांचा बैलगाडी चालकांसह सहभाग नोंदवला आहे.
1 / 5
सांगली : भारतातील सर्वात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीला दुपारी बारा वाजता सुरुवात झाली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने विटा भाळवणी येथे रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे.
2 / 5
बैलजोड्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. या बैलगाडी शर्यतीचे आयोजक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आणि माजी कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम आहेत.
3 / 5
बैलगाडी शर्यत सुरू होण्यापूर्वी बैलांची पूजा करण्यात आली. त्यानंतर शर्यतीला सुरुवात झाली. दोनशेच्या वर बैलजोड्या मालकांनी या शर्यतीत हजेरी लावली. ही बैलजोडी शर्यत पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
4 / 5
देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती पार पडणार असल्याचा आयोजक पैलवान चंद्रहार पाटील यांचा दावा आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील 200 च्या वर टॉपच्या बैलगाडी मालक यांचा बैलगाडी चालकांसह सहभाग नोंदवला आहे.
5 / 5
प्रथम क्रमांक येणाऱ्या बैलगाडी विजेत्यास थार गाडी बक्षीस मिळणार आहे. द्वितीय, तृतीय क्रमांकाला ट्रॅक्टर बक्षीस मिळणार आहे. इतर क्रमांकाच्या विजेत्यांना दुचाकी वाहन बक्षीस रूपात देण्यात येणार आहे.