चंद्रपूर : मुलगी झाली म्हणून बापाला आनंद झाला. तो डिलिव्हरी (delivery) झालेल्या पत्नीकडं मुलीला पाहायला गेला. पण, त्याठिकाणी वेगळंच घडलं. पती-पत्नीचा वाद झाला. या वादात त्यानं सात दिवसांच्या मुलीला घेऊन पळ काढला. त्यानंतर मुलीला रस्त्यावर सोडून तो पळून गेला. गोंडपिंपरी (Gondpimpri) तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे ही घटना घडली. सात दिवसाच्या मुलीला निर्दयी बापाने रस्त्यावर टाकले.
ज्या बापानं हे कृत्य केलं, त्याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कुमोद पौरकर असं या निर्दयी बापाचं नाव आहे. कुमोद हा सिर्सी बेरेडी येथील रहिवासी आहे.
कुमोदचा विठ्ठलवाडा येथील भाग्यश्री देवतळे हिच्यासोबत विवाह झाला. या दोघांना सात दिवसांपूर्वी मुलगी झाली. भाग्यश्रीनं गोंडस बाळाला जन्म दिला.
डिलिव्हरीसाठी भाग्यश्री ही माहेरी गेली होती. शनिवारी मुलीला बघण्यासाठी कुमोद त्याच्या सासरी आला होता.
या दरम्यान पती-पत्नीत भांडण झालं. वाद विकोपाला गेला. कुमोद सात दिवसांच्या मुलीला पकडून निघून गेला.
सासरचे लोकं मुलीला परत घेण्यासाठी त्याच्या मागे धावत होते. त्यामुळं कुमोदनं भर रस्त्यात सात दिवसाच्या मुलीला टाकून पळ काढला.
मात्र या प्रकारामुळे सात दिवसांची मुलगी किरकोळ जखमी झाली. जखमी मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात निगराणीसाठी ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी जखमी मुलीची काळजी घेत आहेत.
कुमोद आणि भाग्यश्री यांच्यासाठी हा आनंदाचा श्रण होता. पण, या आनंदावर विरजण पडले. सासरी असलेल्या भाग्यश्रीशी कुमोदचा वाद झाला.
या वादाचा परिणाम नवजात शिशूला भोगावा लागला. नवजात शिशूला रस्त्यावर यावं लागलं. यात कुमोद कारणीभूत आहे.
पण, त्यानं असं का केलं. हे पोलिसांसमोर सांगावा लागणार आहे. तपासानंतर हा वाद नेमका काय होता, हे स्पष्ट होईल.