अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाती (Civil Hospital)ल आयसीयु विभागातील जळीतकांड (Fire) प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा (Sunil Pokharana) दोषी आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली. मात्र अटकेनंतर वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूत आग लागून 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी समिती स्थापन करुन त्याचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता. या अहवालात सुनील पोखरणा दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर पोखरणा यांना शहर पोलिस उपाधिक्षक अनिल कातकडे यांनी अटक केली होती. (The then District Surgeon Dr. Sunil Pokhrana was arrested and released)
अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात 6 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी भीषण आग लागली होती. या आगीत घटनेच्या दिवशी 14 कोरोनाबधित रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. शॉर्टसर्किटमुळे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील ICU विभागाला आग लागली. या ICU विभागात एकूण 17 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन ही आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत 11 रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता तर अन्य 6 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर केली होती.
रुग्णालयात आग लागणे, आग लागल्यानंतर आग विझविणे, रुग्णांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवणे, रुग्णांचे जीव वाचवणे या सर्वाबाबत हलगर्जीपणा करणे तसेच इतर अनुषंगिक कारणांमुळे 14 रुग्णांच्या मृत्यूस व रुग्णांचे दुखापतीस जबाबदार ठरणाऱ्या संबंधितांविरोधात सरकारतर्फे घटनेच्या दुसऱ्या दिवशी भादवि कलम 304(अ) नुसार फिर्याद दाखल करण्यात आली होती. तसेच आग प्रकरणी तीन डॉक्टर आणि तीन परिचारिकांचं निलंबन करण्यात आलं होतं. (The then District Surgeon Dr. Sunil Pokhrana was arrested and released)
इतर बातम्या
Supreme Court : सेक्स वर्कर्सना रेशनपासून वंचित ठेवू नका; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश