Amol Mitkari : संविधानाचा सन्मान करत असाल यात शंका नाही, अकोल्यात अमोल मिटकरी यांचा राज्यपालांना पत्राद्वारे टोला, पत्रात आणखी काय?

| Updated on: Jul 07, 2022 | 3:41 PM

आपण शिवनेरी व रायगड स्वतः चढून गेलात हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभियानाचा क्षण होता. छत्रपती शिवरायांचाच विचार ज्या भारतीय राज्यघटनेत आलाय तिचे पालन व संरक्षण आपण निश्चीतच करावे या अपेक्षेपोटी आपणास ही संविधानाची प्रत देताना मला आनंद होतोय. म्हणत मिटकरी यांनी राज्यपालांना नवीन वाटचालीस शुभेच्छा पण दिल्या आहेत.

Amol Mitkari : संविधानाचा सन्मान करत असाल यात शंका नाही, अकोल्यात अमोल मिटकरी यांचा राज्यपालांना पत्राद्वारे टोला, पत्रात आणखी काय?
अमोल मिटकरी यांचा राज्यपालांना पत्राद्वारे टोला
Image Credit source: t v 9
Follow us on

अकोला : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कृषी विद्यापीठाच्या (University of Agriculture) दीक्षान्त समारंभासाठी विदर्भात आलेत. यानिमित्त राष्ट्रवादी समर्थित अपक्ष आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी राज्यपालांवर उपरोधात्मक टीका केली. विद्यमान राजकीय परिस्थितीत आपण घटनाबाह्य वागत असल्याचं घटनातज्ज्ञ म्हणतात. तरीही आपण संविधानाचा सन्मान करत असालं यात शंका नाही, असं मत व्यक्त केलं. अमोल मिटकरी राज्यापालांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, प्रथमतः कोरोनानंतरच्या काळात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलपती म्हणून 36 व्या दीक्षांत समारंभास (Convocation Ceremony) आपण स्वत: हजर राहत आहात. विद्यापीठ सदस्य म्हणून आज आपणास भारतीय संविधानाची (Constitution of India) प्रत देऊन सन्मानित करताना मला आनंद होत आहे.

घटनातज्ज्ञांचं म्हणण काय?

आपल्या देशातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्य याचं संविधानात आहेत. पी. सी. अलेक्झांडर हे लोकांचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या जनतेस आजही स्मरणात आहेत. आपण शिवप्रेमी आहात. संविधान प्रेमी असालं याबाबत मी तरी आशावादी आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेकदा घटनाबाह्यच वागलात, असं मत विविध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केलं. मग घाईघाईत घेतलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे, 12 आमदारांची प्रलंबित यादी यामुळे आपली भूमिका वारंवार संशयाच्या भोवऱ्यात यात येत होती. तरीही आपण संविधानाचा नेहमीच सन्मान करत असाल याबाबत मला शंका नाही.

नवीन वाटचालीला दिल्या शुभेच्छा

आपण शिवनेरी व रायगड स्वतः चढून गेलात हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभियानाचा क्षण होता. छत्रपती शिवरायांचाच विचार ज्या भारतीय राज्यघटनेत आलाय तिचे पालन व संरक्षण आपण निश्चीतच करावे या अपेक्षेपोटी आपणास ही संविधानाची प्रत देताना मला आनंद होतोय. म्हणत मिटकरी यांनी राज्यपालांना नवीन वाटचालीस शुभेच्छा पण दिल्या आहेत. या पत्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांनी राज्यपालांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यासाठी त्यांनी घटनातज्ज्ञांचा उल्लेख केला. आपली भूमिका नेहमी संशयास्पद राहिली असल्याचं ते या पत्रात म्हणतात.

हे सुद्धा वाचा