चंद्रपूर : राजुरा शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर देवाडा गावातील नाल्याला आलेल्या पुरात तीन जण वाहून गेले. यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. या घटनेमुळे देवाडा गावात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे राजूरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे (three people death in Chandrapur due to heavy rain).
नेमकं काय घडलं?
गावातील रहिवासी असलेल्या मल्लेश शेंडे यांच्या शेतात शेतीच्या मशागतीचे काम करण्यासाठी काही शेतमजूर आले होते. शेतीचे काम संपवून ते राजू डामिलवार यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर बसून आपल्या घरी परत असताना अचानक पाऊस आला. या पावसाने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला. या जोरदार प्रवाहाने ट्रॅक्टर, कल्टिव्हेटरसह नाल्यात वाहून गेले (three people death in Chandrapur due to heavy rain).
तिघांचा मृत्यू
ट्रॅक्टर नाल्यात पडल्याने माधुरी विनोद वंगणे (वय 27), मलेश शेंडे (वय 45), आणि लक्ष्मी विनोद वगने (वय 7) यांचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर मालक राजू डामिलवार, बाधू कुमरे आणि बालवीर कोवे सुखरूप बचावले. गावातील नागरिकांनी शोध मोहीम राबवून माधुरी विनोद वंगणे आणि लक्ष्मी विनोद वंगणे यांचा मृतदेह शोधले तर मलेश शेंडे यांचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे देवाडा गाव सुन्न झाले आहे. एकाच घरचे मयालेकी मरण पावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
हेही वाचा : Video: काढायला गेले कार, सापडला मासा, मुंबईकरांच्या सुट्टीला असाही तडका