नंदुरबार / जितेंद्र बैसाणे : रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने पोलीस वाहनाचा अपघात झाल्याची घनटा नंदुरबारमध्ये सकाळी घडली. नेत्रंग-शेवाळी महामार्गावर सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ पोलीस गाडी आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात एका पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महामार्गावर खड्ड्यांच्या साम्राज्य पसरले आहे. यामुळे येथे नेहमी अपघाताच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता महामार्ग प्रशासनाने तात्काळ रस्त्यावरील खड्डे भरावे अशी मागणी नागरिकांसोबतच पोलीस दलातील अधिकारी करू लागले आहेत.
पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार आणि मुख्यालयातील कर्मचारी रात्रीच्या गस्तीसाठी तळोदा परिसरात गेले होते. तिथून परत येताना पहाटे त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू वाहतूक होत असते. या महामार्गावर दिवसागणित अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
पोलीस गाडी तळोदाकडून नंदुरबारच्या दिशेने येत असताना रस्त्यावरील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करताना समोरून येणाऱ्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली. या अपघातात पोलीस निरीक्षक भावसार यांच्यासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भावसार यांना गंभीर दुखापत झाली आहे.
एसटीने कारला धडक दिल्याने अपघातात कारमधील डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली. जखमी डॉक्टरवर नांदेडमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.