अहमदनगर : श्रावणाच्या सुरुवातीला 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान जोडून सुट्ट्या असल्याने पर्यटनस्थळांवर गर्दीची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर भंडारदराकडे जाण्यासाठी वाहतूक नियमात बदल करण्यात आलेत. 15 ऑगस्टच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरिश्चंद्र गड, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदीर रतनवाडी, वाल्मिक ऋषी आश्रम, कोंदणी या प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांची रांग लागते. पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई आणि नगर जिल्ह्यातील पर्यटकांचा यात मोठा भरणा असतो.
आता तर जोडून सुट्टी आल्याने 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान या प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. तसेच सध्या पावसामुळे रस्ते मोठया प्रमाणात खराब झालेले आहेत. अशा स्थितीत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक नियमन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आलाय. भंडारदरा येथे जाण्यासाठी वाहनांना वाकी फाटा, वारंघशी फाटा येथून प्रवेश असणार आहे.
दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोळटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा ‘बसेरा’ असतो… सध्या कोरोनाच्या संकटामुळे पर्यटकांना ही मेजवानी बघण्यासाठी जाता येत नाही.
Traffic rout for Bhandardara changed amid Independence day holiday