नांदेड : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Vikhe Patil) नांदेडमध्ये बोलत होते. ते म्हणाले, लम्पी त्वचारोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात लसीकरण सुरू आहे. लम्पीनं (Lumpi) 30 जिल्हे प्रभावित झालीत. 735 जनावरं दगावली. ही कालची आकडेवारी आहे. काही ठिकाणी लसीकरणाची (Vaccination) प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. राज्यात 75 लाख लसी उपलब्ध केलेल्या आहेत.
आधी पाच किलोमीटर परिसरात लसीकरण करावं असं ठरलं होतं. आता सरसकट लसीकरण करतोय, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. आतापर्यंत साधारण 14 लाख लसीकरण झालेलं आहे.
सहाही व्हेटरनरी कॉलेजची मुलं घेतलेली आहेत. एक हजार पदं भरण्यात येणार आहेत. विभागीय स्तरावर ते अधिकार दिलेले आहेत. तातडीची औषधी खरेदी करण्यााचे अधिकारी जिल्हास्तरावर दिलेत.
लसीकरण, औषधोपचाराचा खर्च 100 टक्के शासन करत आहे. जळगाव जास्त प्रभावित आहे. राज्यात एक कोटी 40 लाख पशुधन आहे. लम्पीनं प्रभावित झालेली संख्या मर्यादित आहे.
लसी बाहेरून उपलब्ध करतोय. देशात दोनच कंपन्या या लसी तयार करतात. पुण्यात 60 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रयोगशाळा सुरू केली आहे. तिथं दोन महिन्यात प्रत्यक्ष लसी तयार होतील. ही राज्य सरकारची प्रयोगशाळा आहे, असंही विखे पाटील यांनी सांगितलं.
डीएनए सॅम्पल, ब्लड सॅम्पल, पशुंचा मृत्यू नेमका कसा झाला, यासाठी पुण्याला सॅम्पल पाठवाव्या लागतात. विभागीय स्तरावर लॅब उभ्या करण्याचा विचार करू.
मोकाट जनावरांमुळं रोगांचा प्रसार जास्त होतो. कारण ते चांगल्या गोठ्यामध्ये जाऊन उभे राहतात. मोकाट जनावरांना अटकाव करणे गरजेचे आहे,
असं मत विखे पाटील यांनी व्यक्त केलं.