नालासोपारा : कुख्यात गुंडाची तुळिंज पोलिसांनी नालासोपाऱ्यात आज सायंकाळी धिंड काढली आहे. गुंडाच्या दोन्ही हातात हातकडी घालून, पोलिसांनी हातात काठी घेऊन, गुंडाने ज्या परिसरात दहशत पसरविली होती त्याच परिसरात पायी फिरवून धिंड काढली आहे. या गुंडावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, मारामारी, क्रूरतेने बलात्कार करून संघटित दहशत पसरवणे असे एकट्या तुळिंज पोलीस(Tulinj Police) ठाण्यात 16 गुन्हे दाखल आहेत. गुंडाला पायी फिरवत असताना बघ्यांनीही गर्दी केली होती. गुंडाच्या दहशतीला त्रस्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. हातात हातकडी घालून रस्त्याने फिरवत पोलीस घेऊन जात आहेत तो हा कुख्यात गुंड आहे. निशांत उर्फ मोनू रायडर मनोजकुमार मिश्रा (33) असे धिंड काढलेल्या गुंडाचे नाव आहे. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क येथील हा राहणारा असून हा मूळचा उत्तर प्रदेश आहे. मागच्या 10 वर्षांपासून या गुंडाने नालासोपारा पूर्ण परिसरात संघटित गुन्हेगारी पसरवून आपली दहशत निर्माण करून तो फरार होता. शुक्रवारी सापळा रचून या गुंडाला मिरारोड रेल्वे स्थानक परिसरातून अटक केले होते. आज वसई न्यायालयात याला हजर केले असता 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी(Police Custody) सुनावण्यात आली आहे. (Tulinj police arrested a notorious gangster in Nalasopara this evening)
मोनू रायडर हा कुख्यात गुंड अतिशय क्रूरतेने गुन्हे करत होता. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, प्रगतीनगर, ओसवाल नगरी, विजय नगर, नगीनदास पाडा, तुळिंज हा परिसर त्याचा अड्डा होता. याच अड्ड्यात त्याची मोठ्या प्रमाणात दहशत होती. त्याच परिसरात दोन्ही हाताला हातकडी घालून, रस्त्याने पायी चालवत पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे. काही नाक्यावर थांबवून त्याला चोपही दिला आहे. या गुंडांची धिंड काढत असताना परिसरातील शेकडो महिला, पुरुष, लहान मुलांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. अशा गुंडांना घाबरू नका धाडसाने पुढे या असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत होते. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनीही स्वागत केले आहे.
मात्र आम्ही काही धिंड काढली नाही. ज्याला पकडून आमचे पोलीस घेऊन जात होते, तो कुख्यात गुंड आहे. त्याने ज्या ज्या भागात गुन्हे केले आहेत, त्या घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी आम्ही घेऊन गेलो होतो. यांच्यावर आमच्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 16 गुन्हे दाखल आहेत. काल त्याला मिरारोड येथून अटक केले. आज वसई न्यायालयाने त्याला 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याच्या गुन्ह्याचा आता आम्ही तपास करत आहोत असे पोलिसांनी सांगितले आहे. (Tulinj police arrested a notorious gangster in Nalasopara this evening)
इतर बातम्या
Satara Crime : साताऱ्यात 15 हजारांसाठी विकली दीड वर्षाची मुलगी? खाजगी सावकारीच्या संशयातून तपास सुरु
Wardha : कदम डॉक्टरच्या घरातील ‘त्या’ खोलीत आढळला कुबेराचा खजिना, तब्बल 97 लाख 42 हजार हस्तगत