Chandrapur Tiger Attack : चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 24 तासात दोघांचा मृत्यू

| Updated on: Apr 19, 2022 | 9:56 PM

सध्या जिल्ह्यातील जंगलात ग्रामीण भागात रानमेवा गोळा करण्याचा हंगाम जोरात आहे. यामुळे गावकरी रानमेवा गोळा करण्यासाठी सतत जंगलात जात असतात. अशातच वाघाचे हल्ले वाढल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Chandrapur Tiger Attack : चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 24 तासात दोघांचा मृत्यू
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 24 तासात दोघांचा मृत्यू
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात 24 तासात वन्यजीवांच्या हल्ल्यात दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माणिक नन्नावरे (70) आणि सुरेश लोनबले (50) अशी वाघा (Tiger)च्या हल्ल्यात ठार (Death) झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. एक घटना सिंदेवाही तालुक्यातील सरडपार चक येथे तर दुसरी याच तालुक्यातील पवनपार गावात घडली आहे. सध्या जिल्ह्यातील जंगलात ग्रामीण भागात रानमेवा गोळा करण्याचा हंगाम जोरात आहे. यामुळे गावकरी रानमेवा गोळा करण्यासाठी सतत जंगलात जात असतात. अशातच वाघाचे हल्ले वाढल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Two killed in 24 hours in tiger attack in Chandrapur)

सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या दुहेरी घटना

सिंदेवाही तालुक्यातील सरडपार चक येथे अंगणात झोपलेल्या इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने माणिक नन्नावरे हे रात्री स्वतःच्या घरापुढे अंगणात झोपले होते. झोपेत असताना बिबट्याने त्यांना ठार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दुसऱ्या एका घटनेत याच सिंदेवाही तालुक्यात वन्यजीवांच्या हल्ल्यात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मोहफूल वेचताना सुरेश लोनबले या ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मयत ग्रामस्थ पवनपार येथील रहिवासी असून आज सकाळी गावाजवळील जंगलात मोहफूल वेचायला गेला असताना वाघाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. (Two killed in 24 hours in tiger attack in Chandrapur)

इतर बातम्या

Nagpur Crime : नागपूरमध्ये जन्मदात्या पित्यानेच पैशासाठी नवजात बालिकेला विकले, दोन आरोपींना अटक

Mumbai Crime : मुंबईच्या रस्त्यावर खतरनाक थरार, पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या