पालघर : कोसळलेल्या वीजेचा झटका (Shock) लागून एका दोन वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. यश सचिन घाटाल असे मयत बालकाचे नाव आहे. पालघर तालुक्यातील मनोर जवळील येंबुर (टोके पाडा )येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. घराच्या अंगणात खेळत असताना चिमुकल्याला कोसळलेल्या विजे (Lightening)चा झटका लागला. बालकाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बालकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील मनोर जवळील येंबुर (टोकेपाडा) गावात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोन वर्षाचा यश घराच्या अंगणात खेळत होता. यावेळी अचानक वीज कोसळली आणि वीजेचा झटका यशला लागला. यानंतर बालकाला तात्काळ मनोर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे घाटाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच येंबुर गावावरही शोककळा पसरली आहे.
शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात घडली आहे. लीला योगराज हिडामे असे मयत महिलेचे नाव आहे. मयत महिला सडक-अर्जुनी तालुक्यातील मौजा साले धरणी गावातील रहिवासी आहे. मयत महिला शेतात पेरणीच्या कामाकरीता गेली होती. महिला शेतात काम करत असतानाच अचानक दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस आणि विजेचा कडकडाट सुरु झाला. यावेळी महिलेच्या बाजूलाच वीज पडल्याने यात महिलेचा मृत्यू झाला. (Two year old boy dies in lightning strike in Palghar)