रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथे पोहण्यासाठी आलेल्या 2 तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. भायजेवाडीतील बंधाऱ्यातील गायमुख पऱ्याजवळ ही घटना घडली. पोलिसांनी मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. या बंधाऱ्यात एकूण सहा जण पोहायला गेले होते. त्यापैकी चार जण सुदैवाने बचावले आहेत. (Two young boy drowned in Dimapur Hinjewadi dam in ratnagiri district)
मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील भायजेवाडी येथे एक बंधारा आहे. या बंधाऱ्याला पाणी आल्यामुळे यामध्ये पोहण्यासाठी सहा तरुण आले होते. पोहताना यातील दोन तरुणांना पाण्याचा अंदाज आला नाही. परिणामी ते पाण्यात बुडाले. ही घटना घडताच बाकीच्या चार तरुणांनी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत हे दोन तरुण पाण्यात बुडाले होते. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तरुणांचा शोध घेत पोलिसांनी दोघांचाही मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
दरम्यान, उल्हासनगरात नाल्यात पडून 4 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना घडली. रुद्र गुप्ता असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्याचं नाव आहे. उल्हासनगरातील कॅम्प 3 च्या शांतीनगर गऊबाई पाड्यात ही घटना घडली. आज संध्याकाळी 7 वाजता नाल्यावर लघुशंकेसाठी गेला असताना पाय घसरून हा मुलगा नाल्यात पडला. त्यानंतर नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाने काही वेळापूर्वीच त्याचा मृतदेह बाहेर काढला आहे.
दर दुसरीकडे औरंगाबाद शहरात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आदिल शेख असे या मुलाचे नाव असून केंब्रिज जवळच्या डोहात ही घडना घडली. आदिल शेख हा सहा फूट खोल पाण्यात बुडाल्यानंतर मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, मदतीस उशीर झाल्याने या मुलाने प्राण सोडला. पाणी गढूळ झाल्याने मृतदेह शोधण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणी येत होत्या.मात्र, शेवटी अथक परिश्रमाने या बारा वर्षीय मुलाच मृतदेह बाहेर काढण्यात आला.
इतर बातम्या :
Mumbai Rain | मुंबईतील दरडी जीवघेण्या, 29 वर्षात 290 लोकांनी प्राण गमावले
मुंबईंच्या महापौरांबद्दलचं ते वृत्त खोटं, पेडणेकरांची प्रकृती आता स्थिर, हॉस्पिटलचेही स्पष्टीकरण
(Two young boy drowned in Dimapur Hinjewadi dam in ratnagiri district)
VIDEO: कल्याणमध्ये वृद्धाची चालत्या एक्स्प्रेस रेल्वेसमोर उडी, मोटरमनच्या सतर्कतेमुळे जीव वाचला, पाहा थरारhttps://t.co/ATBYmXboiM#Kalyan #Suicide #Railway
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 18, 2021