रायगडच्या अंबा नदीत बुडून दोघांचा मृत्यू, देवी विसर्जनादरम्यानची घटना

| Updated on: Oct 16, 2021 | 9:36 AM

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पालीजवळ राबगाव इथे अंबा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी देवी विसर्जनादरम्यान ही घटना दुर्दैवी घडली.

रायगडच्या अंबा नदीत बुडून दोघांचा मृत्यू, देवी विसर्जनादरम्यानची घटना
drawn
Follow us on

रायगड : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पालीजवळ राबगाव इथे अंबा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी देवी विसर्जनादरम्यान ही घटना दुर्दैवी घडली.

शिवेंद्र चौहान आणि विवेक लहाने अशी मृतांची नावे आहेत. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. राबगाव इथे नवरात्र निमित्त देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. संध्याकाळी विसर्जनावेळी दगडावरुन पाय घसरुन दोघे नदीत कोसळले त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला.

सांगलीत तलावात बुडून भावा-बहिणीचा मृत्यू

आईसोबत तलावात कपडे धुण्यास गेलेल्या दोघा सख्खा भाऊ बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जत तालुक्यातील उमराणी येथे घडली आहे. रविवारी (11 ऑक्टोबर) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सावित्री बाबुराव यादव (13 ) इयत्ता 8 वी आणि अभिजीत बाबुराव यादव(11) इयत्ता 5 वी अशी पाण्यात बुडून अंत झालेल्या दुर्दैवी मुलांचे नावे आहेत.

जत तालुक्यातील उमराणी व सिदूर रस्त्यावर यादव वस्ती नजिक कुराण पाझर तलाव आहे. या पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. या ठिकाणी कपडे धुण्यास व जनावरांना पाणी पाजण्यासाठी लोकांची गर्दी असते. अभिजित व सावित्री हे दोघे आपल्या आईसोबत तलावावर कपडे धुण्यासाठी गेले होते. हे दोघे पण तलावातील पाण्यात खेळत होते. मात्र तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचे पाय गाळात रुतले. दोघांनीही बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. काळाने त्यांचा बळी घेतला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.

अहमदनगरमध्ये एकाच दिवशी पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू

पाण्यात बुडून एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात घडल्या आहेत. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांना प्राण गमवावे लागले. पती-पत्नी, बाप-लेक आणि सख्ख्या भावांचा यामध्ये समावेश आहे. पाण्यात बुडून एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे मासेमारी ‌करणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. ओढ्यातील पाण्यात बुडून पती-पत्नीला प्राण गमवावे लागले. दुसरीकडे, कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूरजवळील गांजावाडी येथील नाल्यात बुडून बाप-लेकाचा जीव गेला. तर राहुरीजवळील गणपती घाट येथे मुळा नदी पात्रात बुडाल्यामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

पोहण्याचा मोह जीवावर बेतला, औरंगाबादेत तिघांचा बुडून मृत्यू