नालासोपारा : भरधाव डंपरने उडवल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथे सोमवारी दुपारी घडली आहे. रोहित मिश्रा(24) आणि विनय तिवारी(25) अशी मयत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशातील भधोईया जिल्ह्यातील मूळचे रहिवासी आहेत. हे दोघेही नोकरीच्या शोधात मुंबईत आले होते. याप्रकरणी डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. (Two youths were killed on the spot when a dumper hit their bike in Nalasopara)
रोहित आणि विनय मुंबईहून नालासोपाऱ्यात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क रस्त्यावरुन आपल्या दुचाकीवरुन जात होते. यावेळी युटर्न घेताना त्यांच्या दुचाकीला डंपरने उडवले. या अपघातात या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करीत चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. कोरोनाच्या काळात नोकरी, काम धंदा नाही. शेवटी कामाच्या शोधात मुंबईला आले आणि अपघातात जीव गमावून बसल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चंद्रपूरमध्ये मोबाईलच्या नादात शिक्षकाने जीव गमावल्याची दुर्दैवी घटना
मोबाईल हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, या मोबाईल वापराचे अनेक तोटे आणि दुष्परिणामही दिसून येत आहेत. 5 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मोबाईल बोलण्याच्या नादात एका शिक्षकाने आपला जीव गमावल्याची घटना मूल शहरातील पंचशील नगर भागात घडली आहे. चिरकुटा खोब्रागडे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. खोब्रागडे हे रात्री कानात हेडफोन लावून मोबाईलवर चालत असताना रेल्वेचा धक्का बसल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे मूल शहरात हळहळ व्यक्त होतेय.
चिरकुटा खोब्रागडे हे रात्री जेवण झाल्यानंतर घराशेजारी असलेल्या रेल्वे रुळावर फिरायला गेले होते. कानात हेडफोन असल्यामुळे त्यांना रेल्वेचा आवाज आला नाही. गोंदियाकडून बल्लारपूरकडे जाणाऱ्या मालगाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत खोब्रागडे हे दूर फेकले गेले. त्यावेळी त्यांचा जागीत मृत्यू झालाय. (Two youths were killed on the spot when a dumper hit their bike in Nalasopara)
Tesla लवकरच स्वस्तातली इलेक्ट्रिक कार लाँच करणार, फीचर्सही दमदार#Tesla #ElonMusk https://t.co/UgeTeioeLn
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2021
इतर बातम्या
मोबाईलच्या नादात शिक्षकाने जीव गमावला, चंद्रपूरच्या मूल शहरातील धक्कादायक घटना